एका विशिष्ट वयापर्यंत मला वाटायचं की
तिचं नावच 'भंगीण'
आहे की काय?
जशी एक होती न्हावीन माय
एक होती परटीन बाय
एक होती भांडेवाली
आणि ती होती 'भंगीण'
माझ्या बालपणी
टोपलं आणि खराटा घेऊन
ती दररोज यायची घरी
तोंडावर साडीचा पदर धरून
मोठ्याने ओरडायची
'राख टाका राख'
घरातले म्हणायचे
'शिवू नका,लांबा राहा'
आम्ही ताटभर राख आणायचो
तिच्यापासून दूर उभे राहून,
टाकून पळून यायचो...
ती बाहेर राखेच्या मदतीने
आमची घाण गोळा करायची...
आणि आत आम्ही
चोळून चोळून हात धुवायचो...
तसेच जसे
ती धूत असे
खूप घासून घासून
गल्लीतला सार्वजनिक नळ
सर्वांच्या नजरा चुकवून ती ज्या नळाचे
कधी कधी पाणी प्यायची...
भंगीण पुन्हा संध्याकाळी यायची
जोराने ओरडायची
'भाकरी वाढा वो माय'
घरातले म्हणायचे,
'शिवू नका, लांब राहा'
आम्ही दुरडीतून शिळी भाकरी आणायचो
लांब उभे राहून,टाकून पळून यायचो...
टाकलेल्या त्या शिळ्या भाकरी ही
तिची कमाई असायची,
आमची घाण उचलण्याच्या बदल्यात
ज्या आम्ही तिला द्यायचो..
जमिनीवर बसून
ती निवांतपणे एक एक भाकर
पदरात बांधायची...
आणि आम्ही आत
घास घासून हात धुवायचो...
आता-जेव्हा
झगडते आहे भाकरीसाठी
दर दिवशी नवा संघर्ष करतेय
मला भंगीणमाय आठवते
आणि मी विचार करते
किती पाप वाढवून ठेवले मी
असे हात धुवून धुवून
आणि खरंच सांगायचे घरचे
मला तिला शिवायचं नव्हतं
बस्स गळाभेट घ्यायची होती तिची...
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
एक उम्र तक मुझे लगता रहा
उसका नाम ही " मेहतरानी " है
जैसे एक थी नाइन माईं
एक थी धोबिन अम्मा
एक थी बर्तन वाली
और वो थी " मेहतरानी "
मेरे बचपन में
डलिया और झाड़ू उठाये
वो रोज़ घर आती
मुँह पर धोती ( साड़ी ) का छोर टिकाये
जोर से चिल्लाती
" राख़ डार देओ "
घरवाले कहते
" छुइयो मत , दूर रहियो "
हम प्लेट भर राख़ लाते
उससे दूर खड़े हो , फेंककर भाग आते...
वो बाहर राख़ के सहारे
हमारी गन्दगी बटोरती...
और अंदर हम
रगड़कर हाथ धोते...
वैसे - जैसे
वो धोती थी
ख़ूब रगड़कर
मोहल्ले का " सामूहिक नल "
सबसे नज़र बचाकर वो जिससे कभी - कभी
पानी पीती थी...
मेहतरानी फिर शाम को आती
जोर से चिल्लाती
" रोटी दे जइयो "
घरवाले कहते
" छुइयो मत , दूर रहियो "
हम कटोरदान से बासी रोटी लाते
दूर खड़े हो , फेंककर भाग आते...
फ़ेंकी हुयी वो बासी रोटियाँ
उसकी कमाई थी
जो हमारी गंदगी उठाने के बदले हम उसे देते...
धत्ती ( धरती ) में बैठ
वो बड़े सब्र से एक - एक रोटी
पल्लू में बाँधती...
और अंदर हम
रगड़कर हाथ धोते...
अब - जब जूझती हूँ
रोटी के लिए
हर दिन किसी संघर्ष से
मुझे मेहतरानी याद आती है
और मैं सोचती हूँ
कितने पाप चढ़ा लिए मैंने
यूँ हाथ धो - धोकर...
और सच कहते थे घरवाले
मुझे उसे छूना नहीं था
बस गले भर लेना था...
©पूजा व्रत गुप्ता
Puja Vrat Gupta