❤️
मी त्या पायर्यांवर पण प्रेम केले
ज्यावरून चालत तिला भेटायला जात असे
आणि त्या खिडकीवर सुद्धा
जिच्यातून बाहेर पाहात असायचे
तिचे उदास डोळे
माझे अद्यापही त्या काळोखावर
प्रेम आहे
ज्याच्या उजेडात चालत पोहोचलो
होतो तिच्याजवळ
मी त्या सर्व वस्तुंवर प्रेम केले
ज्यांना तिच्या हातांचा स्पर्श झालेला होता-
कधी ना कधी
जशी भिंत
काजळ लावलेला आरसा
कपडे वाळवण्याचे दोर
खोलीच्या चाव्या
आणि खोलीतल्या सगळ्या खुंट्या-
जिथे आम्ही आमच्या प्रार्थना
टांगलेल्या होत्या कधीतरी
मी कपाटात लोंबकळणार्या त्या
सर्व हॅंगर्सवरदेखील प्रेम केलेय
ज्यावर शुभ्र फेसाळ सर्फाप्रमाणे दरवळत
असायचे तिचे हात
मी त्या सार्या सार्या वस्तुंवरती
प्रेम केलेय
ज्यांना तिच्या तळव्यांचा स्पर्श झाला होता
जशी पृथ्वी
जसे हे सबंध जग
याप्रमाणे मी
जगातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम केलेय-
तिच्या प्रेमाखातर.
❤️
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
❤️
मूळ हिंदी रचना
मैं उन सीढ़ियों से भी प्रेम करता हूँ
जिन पर चलकर उससे मिलने जाया करता था
और उस खिड़की से भी
जिसके बाहर देखती थीं उसकी उदास आँखें
मुझे अब भी उस अँधेरे से प्रेम है
जिसके उजालों में चलकर पहुँचा था उसके पास
मैंने उन सारी चीज़ों से प्रेम किया
जो उसके हाथों से छुई गई थीं—
कभी न कभी
जैसे दीवार
काजल लगा आईना
कपड़े सुखाने की रस्सियाँ
कमरे की चाबियाँ
और कमरे की सारी खूँटियाँ—
जहाँ हमने अपनी प्रार्थनाएँ लटकाई थीं कभी
मैंने अलमारी में लटके उन सारे हैंगर्स से भी प्रेम किया
जिनमें सफ़ेद झाग वाले सर्फ़ की तरह महकते थे उसके हाथ
मैंने उन सारी चीज़ों से प्रेम किया
जिन्हें उसके तलवों ने छुआ था
जैसे पृथ्वी
जैसे यह सारा संसार
इस तरह मैंने
दुनिया की हर एक चीज़ से प्रेम किया—
उसके प्रेम में।
❤️
©नवीन रांगियाल
Navin Rangiyal