अमृता प्रीतम

अमृता प्रीतम

तू म्हणालास-
अमृताप्रमाणे होत चाललीयस तू!

तुला छान वाटेल
साहिरचे नाव लिहिले जाणे
तुझ्या पाठीवर

तुला चांगले वाटेल
घरात विखरून पडलेली सिग्रेटीची थोटकं पाहून

तू सांभाळून ठेवशील
जशी ठेवायची अमृता
दिले गेलेले चुंबन
लिहिली गेलेली पत्रं
आणि तळहातांची उब

मी माघारी परतेन दर वेळेस तुझ्यापाशी
अर्ध्या रात्री जेव्हा तू लिहिशील साहिरची गाणी
तुझ्या कक्षात हळूच येऊन पाहून जाईन

मी इमरोजसारखा तुला सांभाळतोय

प्रेमात शुभ्र फुल बनत चाललीयस तू

मंगल गीताप्रमाणे तुला ऐकले जाऊ शकते
जलक्रीडा करणारी तू एखादी बालिका आहेस

पुस्तकाच्या पानांवर पसरत 
चालली आहेस
पुस्तकांपासून दूर तुझी तडफड तशीच आहे 
जणू कुणी जलदस्यू 
तुझ्या दिशेने हत्यार घेऊन पळत सुटलाय

तू वाचवशील
जगातल्या तमाम ग्रंथालयांना

प्रेमात मुलगी शुभ्र फुल होत असते
आणि पुस्तकवेडी पोर अमृता प्रीतम.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

तुमने कहा - 
अमृता की तरह हो रही हो तुम!

तुम्हें अच्छा लगेगा 
साहिर का नाम लिखा जाना 
तुम्हारी पीठ पर 

तुम्हें अच्छा लगेगा 
घर में बिखरे हों सिगरेट के बट 

तुम संभाल कर रखोगी 
जैसे रखती थी अमृता
दिए गए चुंबन 
लिखे गए ख़त 
और हथेलियों की गर्माहट

मैं लौट आऊंगा हर बार तुम्हारे पास 
आधी रात गए जब तुम लिखोगी साहिर के नग्मे 
तुम्हारे कमरे में धीमे से आकर देख जाऊंगा

मैं इमरोज़ की तरह तुम्हें सहेज़ रहा हूॅं 

प्रेम में सफ़ेद फूल बन रही हो तुम 
मंगल गीत की तरह तुम्हें सुना जा सकता है
जल क्रीड़ा करती तुम कोई बालिका हो

क़िताब के पन्नों पर बिखर रही हो
क़िताबों से दूर तुम्हारी व्याकुलता वैसी ही है 
जैसे कोई जल दस्यु तुम्हारी तरफ़ हथियार लिए दौड़ रहा हो

तुम बचा लोगी 
दुनिया के तमाम पुस्तकालयों को

प्रेम में लड़की सफ़ेद फूल हो जाती है 
और क़िताबी लड़की अमृता प्रीतम ।।

©ज्योति रीता 
Jyoti Rita
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने