अजूनही तसेच भेटत असतात मित्र
ख्याली खुशाली विचारीत असतात
एक हात हातात घेतात,
दूसर्याने गळाभेट घेतात.
आवाजावरून ओळखतात फोनवर
आनंदी होत असतात
व्हाटसअप स्टेटस पाहून.
पद-प्रतिष्ठा आणि संपत्तीचा मनात
गर्व ठेवीत नाहीत
बेधडक विचारत असतात
पगार.
रस्त्याच्या कडेला
टपरीवर
सोबत पित असतात चहा
जर वेळ मिळाला तर
सभा-समारंभात देखील होत
असतात सहभागी.
यश मिळाल्यावर खूश तर
आजारपणाने चिंताग्रस्त
आणि समजूतदारपणामुळे
वैतागून जात असतात.
राजकारणावर विभागले जातायत आजकाल,
मुसलमान संबोधून टीका करीत असतात,
हसत हसत सेक्यूलर म्हणतात.
न रागावता कम्युनिस्ट म्हणतात
फेमिनिस्ट म्हणतात कधीकधी
आणि माझ्याशी असहमती असूनदेखील पून्हा भेटण्याचा वायदा करीत असतात प्रत्येक वेळेस.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
दोस्त
अब भी वैसे ही मिलते हैं दोस्त
हाल-चाल पूछते हुए
एक हाथ मिलाते हैं
दूसरे से गले मिलते हैं.
आवाज से पहचान लेते हैं फोन पर
खुश हो जाते हैं
व्हाट्सएप स्टेटस देखकर.
पद-प्रतिष्ठा और पैसों का
अहंकार नहीं रखते
बेझिझक पूछ लेते हैं तन्ख्वाह.
सड़क किनारे गुमटियों पर
साथ पी लेते हैं चाय
अगर वक्त मिले तो
आयोजनों-समारोहों में भी जो जाते हैं शामिल.
उपलब्धियों पर खुश
बीमारियों से चिंतित
और समझदारी पर हैरान हो जाते हैं.
राजनीति पर बंट जाते हैं आजकल
मुस्लिम कहकर तंज करते हैं
मुस्कुराते हुए सेकुलर कहते हैं.
गुस्सा हुए बगैर कम्युनिस्ट कहते हैं
फेमिनिस्ट कह देते हैं कभी-कभी
और मुझसे असहमत होते हुए भी
फिर से मिलने का वादा करते हैं हर बार .
©Ashok Kumar
अशोक कुमार