चव

चव

चव

'यात मीठ कमी आहे
त्यात अधिक आहे
ते खूपच तिखट
हे अळणी आहे
हे खूपच सप्पक आहे
ते गोडीला कमी झालंय
हे कमी शिजलंय
ते फारच भाजलं गेलंय
हे कमी मऊ आहे
ते खूप कडक आहे'
म्हणत जारी केलेल्या 
या प्रमाणपत्रांच्या दरम्यान
तुझ्या चवीचे रांधताना
ती आपल्या चवींना
वाफेबरोबर काहीशी अशी
उडवून लावते की
त्या पून्हा तिच्या जीभेवर
दुसर्‍यांदा परतून येत नाहीत!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी रचना

"इसमें नमक कम
उसमें ज्यादा है
वो बेहद तीखा,
ये सादा है
ये बहुत फीका है,
वो कम मीठा है,
ये कम पका
वो भुना ज्यादा है,
ये मुलायम कम है
वो करारा ज्यादा है,"
कहकर जारी किए इन 
प्रमाणपत्रों के बीच,
तुम्हारे स्वाद पकाते 
वो अपने स्वाद,
भाप संग कुछ यूं 
उड़ा देती है कि 
वे फिर उसकी ज़ुबान पर 
दोबारा लौटकर नहीं आते !

©सुजाता गुप्ता
Sujata Gupta 

चित्रः
अनु प्रिया 
Anu Priya
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने