आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
जागे झाले पून्हा
पितृसत्ताभान
नारीचा सन्मान
नाकारिती

नियम-अटींचा
जाच महिलांना
रान पुरूषांना
मोकळेच

सगळे ते धर्म
सगळ्या संस्कृती
स्त्रीला ठरविती
भोगदासी

फतवे-हुकूम
सोडणार नर
नारी भोगणार
वनवास

परंपरा पाळा
संस्कृती सांभाळा
आयुष्याला जाळा
घरासाठी

बाईने राबावे
बाईने झिजावे
सजावे धजावे
बाईनेच

'कुंकु-टिकलीत
लपली संस्कृती'
वैदिक विकृती
बरळते

लिंगभेद नको
सांगे संविधान
खोड सनातन
संपेचिना

मनु-रूग्ण किडा
करी वळवळ
सत्ता पिलावळ
पोसतसे

दाढी-मिशीलाच
मग्रुरी सत्तेची
माता-भगिनींची
परवड

संविधानद्रोही
मुर्ख बडबड
शेकावे थोबाड
खेटराने!
🚩
     -भरत यादव
   Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने