सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग!
🍃
क्रूर वैदिकांची तळी
नको उचलू तू बळी
अशा या संकटकाळी
सावध होई

आचार्य म्हणजे पंड्ये
सारी मनुची भावंडे
तत्त्वज्ञानाची थोतांडे
रचिताती बा

मूठभरांच्या हिताचा
धर्म प्रचारिती साचा
आणि घात बहूजनांचा
करती नित्य

जप समतेचा करती
समरसताच प्रसविती
भेदाभेदाची कुनीती
पसरवती

वेदांत विद्येचे गोडवे
गात फिरती गाढवे
गुणगान गाती बडवे
कुव्यवस्थेचे

बुद्धविचाराचे वैरी
धर्मखोरांचे कैवारी
भिकारडे ते दरबारी
राजसत्तेचे

जानवे गर्वे मिरविती
माणसात भेद करती
चातुर्वर्ण्याचा फुंकिती
उकिरडाच

मुर्ती-पुतळ्यांची उत्तुंगता
व्यर्थ धातूंची कलात्मकता
हवी विचारांचीही महत्ता
बुद्ध-बसवण्णांपरी.
🍃
         -भरत यादव
    Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने