माझा विकास

माझा विकास

माझा विकास

गावात शिक्षण नीट नव्हते
आम्ही शिक्षणमंत्र्यांना भेटू 
इच्छित होतो
पण आम्ही शहरात आलो
शहरातल्या त्या गल्लीतले ड्रेनेज बंद असायचे
आम्ही उपायुक्तांना भेटू पाहात होतो
पण आम्ही घर बदलले
वीज यायची जायची
आम्ही वीज वितरण कार्यालयात जाऊ बघत होतो
पण आम्ही इन्व्हर्टर घेऊन आलो
पाणी घाण यायचे
आम्ही भेटू पाहात होतो अभियंत्यांना
पण आम्ही प्यूरीफायर आणले
शहरात खूप उष्मा होता
आम्ही झाडे लावू इच्छित होतो
पण एसी घेऊन आलो

गावात 
अजूनही शिक्षण नाहीये
शहरातल्या गल्लीतले ड्रेनेज अद्यापही बंद आहे
पाणी अजूनही घाणच येतेय
वीज तशीच येत जात असते
झाडे लावली जात नाहीयेत, 
तोडली जाताहेत

मी जमवलेत घरात सर्व पर्याय
मी माझा विकास घडवलाय!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

मेरा विकास 

गाँव में शिक्षा ठीक नहीं थी
हम शिक्षा मंत्री से मिलना चाहते थे
मगर हम शहर आ गये
शहर की उस गली का सीवर बन्द रहता था 
हम उपायुक्त  से मिलना चाहते थे 
मगर हमने मकान बदल लिया
बिजली आती जाती थी
हम बिजली विभाग जाना चाहते थे 
मगर हम इन्वेर्टर ले आये
पानी गन्दा आता था
हम मिलना चाहते थे अभियंताओ  से 
मगर हम प्योरीफाएर ले आये
शहर में बहुत थी गर्मी
हम पेड़ लगाना चाहते थे
मगर ए सी ले आये

गाँव में 
अब भी शिक्षा नहीं है
शहर की गली का सीवर अब भी बन्द है
पानी अब भी गन्दा ही आता है
बिजली वैसे ही आती जाती है
पेड़ लग नहीं  कट रहे हैं

मैंने जुटा लिए हैं घर में सभी विकल्प 
मैंने
विकास कर लिया है

©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने