सुखी-संपन्न लोक नेहमी
आपल्या एकटेपणाविषयी
बोलत असतात.
जराशा विचारवंताच्या अविर्भावात ते
नेहमी सांगत असतात की
सर्वकाही असूनदेखील मनुष्य
किती एकटा आहे!
ते रस्त्यावरून दररोज येणार्या-जाणार्या
कामगारांकडे बिनचेहर्याच्या गर्दीप्रमाणे पाहात असतात.
आपल्या कारचे टायर बदलणार्या
किंवा घराची झाडलोट-रंगकाम करणार्या मजूरांना ते नावानिशी ओळखत नसतात आणि
काही दिवसातच त्यांचा चेहरासुद्धा
विसरून जात असतात.
लेबर चौकात उभ्या असलेल्या मजूरांकडे पाहून त्यांना वाटत असते की देशाची लोकसंख्या प्रचंड
वाढली आहे.
सुखी-संपन्न लोकांना
सामान्य लोकांबद्दल नेहमी
खूप सार्या तक्रारी असतात.
ते त्यांचा अशिक्षितपणा,आळस,उद्दटपणा
अधिक लेकरं जन्माला घालण्याची त्यांची वृत्ती आणि
त्यांच्यात देशभक्तीची उणीव असल्याबद्दल नेहमी बोलत राहातात.
सरकारबद्दल ते नेहमी
सहानुभूतीपूर्वक विचार करीत असतात आणि म्हणत असतात की सरकारने अखेर करावे तरी काय!
ते सामान्य लोकांना सुधारण्यासाठी आणि त्यांची खुमखूमी जिरवण्यासाठी हुकूमशाहीलाच
सर्वात प्रभावी मानत असतात.
सुखी-संपन्न लोकांना
बदलणार्या ऋतूंची,
झाडे आणि फुलांची
तसेच
नद्या-पर्वत यांच्याविषयीची
केवळ इतकीच माहिती असते की ते त्यांच्याविषयी बोलू शकतील
जेव्हा त्यांच्याजवळ रिकामा वेळ घालविण्यासाठी अन्य कुठला
विषय नसेल तेव्हा.
सुखी-संपन्न लोक आपल्या इवल्याशा
सुखी-संपन्न विश्वात
अवघे आयुष्य व्यतीत करीत असतात आणि
आपल्या दुःखी होण्याच्या कारणांविषयी काहीच जाणून घेऊ शकत नाहीत.
सुखी-संपन्न लोकांना
या खूप विशाल जगातल्या
सामान्य लोकांच्या खूप मोठ्या लोकसंख्येच्या जीवनाविषयी
खूप कमी माहिती असते
आणि
जगभराच्या सर्व गरजा भागवणारे सर्वसामान्य लोक
त्यांच्या डोक्यात कुठेच नसतात
ते मानवतेवरील संकटाविषयी
बोलत असतात तेव्हा.
सुखी-संपन्न लोक
मनुष्यतेपासूनचे आपले
फटकून वागणे
आणि
त्याच्या कारणांविषयी कधी जाणू शकत नाहीत
आणि
आपल्या सुखी-संपन्न जीवनातल्या अनंत क्षुद्र दुःखांबद्दलच सतत
विचार करीत आणि रडगाणे गात
ध्यान-योग आणि
विपश्यना करीत
नियमित हेल्थ चेकअप करवून
आणि मरणाला भीत भीत
एक दिवस,
अखेरीस मरूनच जातात खरोखरच!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
सुखी-सम्पन्न लोग
सुखी-सम्पन्न लोग अक्सर
अपने अकेलेपन की बातें करते हैं I
थोड़ी दार्शनिक मुद्रा में अक्सर
वे कहते हैं कि सबकुछ होते हुए भी
मनुष्य कितना अकेला होता है!
वे सड़क से रोज़ाना गुज़रते
कामगारों को बिना चेहरों वाली
भीड़ की तरह देखते हैं I
अपनी कार के टायर बदलने वाले
या घर की सफाई-पुताई करने वाले
मज़दूर को वे नाम से नहीं जानते
और कुछ ही दिनों बाद
उसका चेहरा भी भूल जाते हैं I
लेबर चौक पर खड़े मज़दूरों को देखकर
उन्हें लगता है कि देश की
आबादी बहुत बढ़ गयी है I
सुखी-सम्पन्न लोगों को आम लोगों से
हमेशा बहुत सारी शिक़ायतें रहतीं हैं I
वे उनके गँवारपन, काहिली, बद्तमीज़ी,
ज़्यादा बच्चे पैदा करने की उनकी आदत
और उनमें देशभक्ति की कमी की
अक्सर बातें करते रहते हैं I
सरकार के बारे में वे हमेशा
सहानुभूतिपूर्वक सोचते हैं और
कहते रहते हैं कि सरकार भी आख़िर क्या करे!
वे आम लोगों को सुधारने और उनके
बिगड़ैलपन को दूर करने के लिए
तानाशाही को सबसे कारगर मानते हैं I
सुखी-सम्पन्न लोगों को
बदलते मौसमों, पेड़ों और
फूलों के बारे में और नदियों-पहाड़ों के बारे में
बस इतनी जानकारी होती है
कि वे उनके बारे में बातें कर सकें
जब उनके पास करने के लिए
कोई और बात न हो.
सुखी-सम्पन्न लोग अपनी छोटी सी
सुखी-सम्पन्न दुनिया में
पूरी उम्र बिता देते हैं
और अपने दुखी होने के कारणों के बारे में
कुछ भी नहीं जान पाते I
सुखी-सम्पन्न लोगों को
इस बहुत बड़ी दुनिया के आम लोगों की
बहुत बड़ी आबादी के जीवन के बारे में
बहुत कम जानकारी होती है
और दुनिया की सारी ज़रूरतें
पूरी करने वाले मामूली लोग
उनके ज़ेहन में कहीं नहीं होते
जब वे मनुष्यता के संकट की बातें करते हैं I
सुखी-सम्पन्न लोग मनुष्यता से अपनी दूरी
और उसके कारणों के बारे में
कभी जान नहीं पाते
और अपने सुखी-सम्पन्न जीवन के
अनंत क्षुद्र दुखों के बारे में ही
सोचते हुए और रोते-गाते हुए,
ध्यान और योग और विपश्यना करते हुए,
नियमित हेल्थ चेकअप कराते हुए
और मरने से डरते हुए
एक दिन, आख़िरकार मर ही जाते हैं
सचमुच!
©कविता कृष्णपल्लवी
Kavita Krishnapallavi