समुद्र आणि वाळवंट

समुद्र आणि वाळवंट

समुद्र आणि वाळवंट

समुद्राचा निर्जन विस्तार पाहून
तसेच भय वाटते
जसे वाळवंटाला पाहून

समुद्र आणि वाळवंट यांच्यात
अजब साम्य आहे

दोघेही असतात विशाल
लाटांनी भरलेले

आणि दोघेही
भरकटलेल्या माणसाला मारत
असतात तहानलेल्या अवस्थेत

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

समुद्र के निर्जन विस्तार को देखकर
वैसा ही डर लगता है
जैसा रेगिस्तान को देखकर

समुद्र और रेगिस्तान में अजीब साम्य है

दोनों ही होते हैं विशाल
लहरों से भरे हुए

और दोनों ही 
भटके हुए आदमी को मारते हैं
प्यासा

©नरेश सक्सेना
Naresh Saxena 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने