गजाला,तू एकटी नाहीयेस

गजाला,तू एकटी नाहीयेस

गजाला, तू एकटी नाहीयेस

गजाला, 
तुझ्या डोळ्यात चमकत आहे
सिंधूनदीचे पाणी
हिंदुकुश पर्वत
आणि मध्यान्हीचा सूर्य
तू जेव्हा झाकत असतेस डोके
गोळा करतेस सगळे आभाळ
आपल्या अवतीभोवती

चिमुकले हात मागतात दुआ
त्या खुदाकडे
ज्याचा ठावठिकाणा शोधत फिरतेय
तुझी पिढी
न जाणे केव्हापासून

लोक म्हणतात,
देव सर्वांना बघत असतो आकाशातून
अवश्य बघत असेल त्यांनाही
जे कुंड्यांमधून उगवू पाहातायत
बाईचं अस्तित्व
आणि अशा कठपुतळ्या
ज्या हालचाल करतील त्यांच्या इशार्‍यांनुसार

गजाला, 
या भुयाराच्या बाहेर
आता फक्त जंगल आहे
तुझ्या मदरशात ठासून भरलीयत
शस्त्रास्त्रे-गोळाबारूद आणि बंदूका
ज्यांच्याशिवाय जिवंत राहाण्याचा 
भरवसा नाहीये त्या लोकांना,
कुणास ठाऊक कुठल्या मदरशातून
घेतलेय त्यांनी शरीयतचे शिक्षण?

गजाला,
समजून घे काळाची गरज
शिक,काळाच्या मदरशात
इतक्या असीम शांततेसह की काळसुद्धा
ऐकू न शकेल 
तुझ्या हृदयाची धडधड

गजाला, 
तुझ्या डोळ्यात चमकत आहे
सिंधूनदीचे पाणी
हिंदुकुश पर्वत
आणि मध्यान्हीचा सूर्य
बघशील एक दिवस
तुझ्या सौंदर्यावर चमकेल
मानवतेचा प्रकाश
गजाला, तू एकटी नाहीयेस!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

गज़ाला तुम अकेली नहीं हो 

गज़ाला तुम्हारी आँखों में चमकता है
सिंधु नदी का पानी 
हिंदुकुश पर्वत
और दोपहर का सूरज
तुम जब ढकती हो सिर 
समेट लेती हो पूरा आसमान
अपने इरादों के इर्द-गिर्द।

नन्हें-नन्हें हाथ माँगते हैं दुआएं
उस खुदा से
जिसका पता खोजती फिर रही है 
तुम्हारी नस्ल
न जाने कब से।

लोग कहते हैं 
खुदा सबको देखता है आसमान से
ज़रूर देखता होगा उन्हें भी
जो गमले में उगाना चाहते हैं
औरत का वज़ूद
हव्वा की नस्ल 
और ऐसी कठपुतलियाँ
जो रक्स करे उनके इशारों पर। 

गज़ाला इस सुरंग के बाहर
अब सिर्फ जंगल है
तुम्हारे मदरसे में भर दिया गया है
असलाह – गोला, बारूद और तमंचे
जिनके बगैर ज़िंदा रहने का भरोसा 
नहीं है उन लोगों को 
पता नहीं किस मदरसे में ली थी 
उन्होंने शरिया की तालीम?

गज़ाला, समझो वक्त की नज़ाकत को
पढ़ो, वक़्त के मदरसे में
इतनी खामोशी के साथ कि वक़्त भी
सुन ना सके तुम्हारे दिल की धड़कन।

गज़ाला तुम्हारी आँखों में चमकता है
सिंधु नदी का पानी 
हिंदुकुश पर्वत
और दोपहर का सूरज
देखना एक दिन  
तुम्हारे जमाल पर चमकेगा
इंसानियत का नूर
गज़ाला तुम अकेली नहीं हो!

©राजेश्वर वशिष्ठ
Rajeshwar Vashistha 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने