शोधपत्रकारितेच्या काळात

शोधपत्रकारितेच्या काळात

शोधपत्रकारितेच्या काळात
/ विरेंदर भाटिया
🍁
शोधपत्रकारितेच्या काळात
पत्रकार मलाइका अरोराच्या घरापुढे जमले आहेत
ते शोधू पाहताहेत ऊप्स मुव्हमेंट
सांगू पाहतायत
किती खोल होता तिचा ब्लाऊज
किती अनावृत्त होती तिची कंबर

शोधपत्रकारितेच्या काळात
पत्रकार शोधू पाहतायत ते तारे
ज्यांनी टाळेबंदीमध्ये टाळ्या-थाळ्या
वाजवल्या
ज्यांनी टाॅर्च पेटवून राष्ट्राला उजळवले
ज्यांनी राष्ट्रवादी असण्याचे कर्तव्य निभावले
राष्ट्रवाद गरजेचा आहे,
हे शोधपत्रकारांनी आपल्याला अधिक सांगितले

शोधपत्रकारितेच्या काळात
पत्रकार शोधून काढू पाहतायत चिठ्ठीवाल्या बुवा-बाबाची यशोगाथा
कुणाच्या आशिर्वादाने चमत्कारी बनले बुवा-बाबा
कुठल्या शक्तीचा आशिर्वाद आहे त्यांच्यावर
ते बुवा-बाबाचा जमाव दाखवतात आपल्याला
बुवा-बाबाच्या अलिशान आश्रमाचे फोटो दाखवतात 
ते बुवा-बाबाच्या जयजयकाराने सुरू करतात आपले कथन

शोधपत्रकारितेच्या काळात
पत्रकार रस्त्यांवर मरणारे लोक 
नाहीत दाखवत
महामारीमध्ये मेलेल्या लोकसंख्येची आकडेवारी नाहीत शोधत
आर्थिक विकासाची आकडेवारी रोज देत असते केंद्रिय बॅंक
शोधपत्रकार त्यातून एखादी स्टोरी नाहीत शोधत
ते घृणा शोधतात
तिरस्काराचे वर्ग निश्चित करतात
ते शोधत असतात
की महामारी,दहशतवाद,लोकसंख्या,
देशद्रोह यांच्यामध्ये
त्याच निश्चित केलेल्या वर्गाचा 
वाटा आहे ते
त्याच निश्चित वर्गामुळे आहेत 
देशामध्ये समस्या 
ते लोक नसतील तर कुठली समस्या शिल्लकच 
राहणार नाही

शोधपत्रकारितेच्या काळात
पत्रकारांनी आपल्याआत 
एक जीव शोधला
ज्याला शेपूट होते
मणका नव्हता
हा जीव थोडासा आराम करणे 
पसंत करतो
त्यानेच धावपळ करणार्‍या पत्रकारांना थोडाफार आराम करायला शिकवले
शोधपत्रकारितेचा हा सर्वात महत्वाचा शोध होता

पत्रकारितेच्या एका प्रचंड 
नकारात्मक काळात
काही पत्रकारांनी सत्तेचे घोटाळे शोधले
मठाधिश बुवा-बाबांचे शोषण शोधले
ते न सत्तेकडून काही अपेक्षा 
करीत होते
न बुवा-बाबांच्या चंगळवादी शैलीने 
प्रभावीत होते
ते खरेतर काळासोबत चालणारे पत्रकार नव्हते
ते समजत होते की खरे बोलणे 
हीच पत्रकारिता आहे
त्यांना ठाऊक नव्हते कदाचित
की खोट्याला खरे करणे ही
पत्रकारिता होती!

शोधपत्रकारितेचा काळच
पत्रकारितेचे सुवर्ण युग आहे
याच काळात
पत्रकारांनी भरभरून सुवर्ण कमावले
हाच काळ 
पत्रकारांचा सुवर्णकाळ होय

शोधपत्रकारितेच्या या सुवर्णकाळात
आता पत्रकारिता स्वतःला
शोधत आहे,
स्वतःवर चरफडत आहे

सुवर्णकाळ हा कुठल्याही युगाचा अखेरचा काळ असतो
पत्रकारितासुद्धा आता अखेरचा श्वास मोजीत आहे.
🍁
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 
🍁
खोजी पत्रकारिता के दौर में

खोजी पत्रकारिता के दौर में
पत्रकार मलाइका अरोरा के घर के आगे जमा हैं
वे खोज लेना चाहते हैं ऊप्स मूवमेंट
बताना चाहते हैं
कितना डीप था उसका ब्लाउज
कितनी अनावृत थी उसकी कमर

खोजी पत्रकारिता के दौर में
पत्रकार खोज लेना चाहते हैं वे सितारे
जिन्होंने लोकबन्दी में ताली-थाली बजाई
जिन्होंने टॉर्च जलाकर राष्ट्र को उजियारा दिया
जिन्होंने राष्ट्रवादी होने का फर्ज निभाया,
राष्ट्रवाद जरूरी है
ये खोजी पत्रकारों ने हमे ज्यादा बताया

खोजी पत्रकारिता के दौर में
पत्रकार खोज लेना चाहते हैं चिट्ठी वाले बाबा की
सक्सेस स्टोरी
कि किस आशीर्वाद से चमत्कारी हुये बाबा
किस शक्ति का आशीर्वाद है उनपर
वे बाबा का काफिला दिखाते हैं हमें
बाबा के आलीशान आश्रम की तस्वीरें दिखाते हैं
वे "बाबा जी के जयकारे" से शुरू करते  हैं अपना कहन

खोजी पत्रकारिता के दौर में
पत्रकार सड़क पर मरते लोग नही दिखाते
महामारी में मर गई आबादी की सँख्या नही खोजते
आर्थिक विकास के आंकड़े रोज देता है केंद्रीय बैंक
खोजी पत्रकार उसमे से स्टोरी नही खोजते
वे 
वे नफरत खोजते हैं
नफरत के वर्ग तय करते हैं
वे खोजते हैं
कि महामारी, आतंक, जनसंख्या, अराजकता, देश द्रोह में 
उसी तय वर्ग का योगदान होता है 
उसी तय वर्ग की वजह से हैं देश मे समस्याएं
वे न हों तो कोई समस्या बची न रहे

खोजी पत्रकारिता के दौर में
पत्रकारों ने अपने भीतर एक जीव खोजा
जिसके दुम थी
रीढ़ नही थी
यह जीव थोड़ा आराम पसन्द था
इसी ने भागते-दौड़ते पत्रकारों को 
थोड़ा आराम करना सिखाया
खोजी पत्रकारिता की यह
सबसे अहम खोज थी

पत्रकारिता के एक बेहद नकारा दौर में
कुछ पत्रकारों ने सत्ता के घोटाले खोजे
मठाधीशों बाबाओं के दमन खोजे
वे न सत्ता से कुछ चाहते थे
न बाबाओं की शानो शौकत से चमत्कृत थे
वे दरअसल दौर के साथ चलने वाले पत्रकार नही थे
वे समझते थे कि सच कहना ही पत्रकारिता है 
वे नही जानते थे शायद
कि झूठ को सच मे बदल देना पत्रकारिता थी

खोजी पत्रकारिता का दौर ही
पत्रकारिता का स्वर्णिम दौर है
इसी दौर में
पत्रकारों ने भर-भर स्वर्ण कमाया
यही दौर
पत्रकारों का स्वर्णिम दौर है

खोजी पत्रकारिता के इस स्वर्णिम दौर में
अब 
पत्रकारिता खुद को खोज रही है
खीझ रही है

स्वर्णिम दौर किसी भी युग का अंतिम युग होता  है 
पत्रकारिता भी अब अंतिम सांसे गिन रही है।
🍁
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
🍁🍁🍁
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने