पक्व लोंब्या
मक्याच्या
मनांमध्ये
सोनेरी रंग भरत असतात
आडव्या-तिरक्या भाकरीचा
खरपूस सुवास
श्वासात भरून
इच्छा,असोशी
मनात उत्साह
जागवत असतो
मक्याच्या खरपूस
लोंब्यादेखील
भूकेचे गणित
खूप चांगल्या तर्हेने
जाणत असतात
ओळखत असतात
आणि
रिकाम्या ताटांचे
भरलेले गणित
होऊन जातात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
🍁
मूळ हिंदी कविता
मक्के की बालियाँ
पकी बालियाँ
मक्के की
मनों में रंग भरती हैं
सुनहरे
आड़ी-तिरछी रोटी की
सोंधी सुगंध
साँसों में भर
चाह, आस,
मन में उत्साह
जगाती हैं
मक्के की सोंधी
बालियाँ भी
भूख का गणित
खूब अच्छी तरह
जानती हैं, पहचानती हैं
और
खाली थालियों का
भरा गणित
बन जाती हैं ।
©अनिता रश्मि
Anita Rashmi