पुण्याई

पुण्याई

पुण्याई

सुप्रसिद्ध चित्रकार आणि 
संवेदनशील कलावंत
अनु प्रिया 
यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे अप्रतिम चित्र बरेच काही सांगून जाते.

हे मनोहारी चित्र मलाही काही ओळी सुचवून गेले.
---------------

अंधाराची खोल खाई
घोर अज्ञानाशी लढाई
झेप उंच उंच घेई
साऊच्या तू लेकीबाई

चंद्र टांगला अंगणी
उद्या झुकेल सूर्यही
धरी हातात लेखणी
देई उजेडाची ग्वाही

वही-पुस्तक नि शाळा
मुक्तीची ही उगवाई
कंदीलाच्या प्रकाशात
चंद्र गाईल अंगाई

गर्द काळोखाला आता
लाज वाटते गं बाई
दिली हातात लेखणी
क्रांतीज्योतीची पुण्याई
©भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने