एक
अखेरपर्यंत वाचकच राहू नकोस,
सगळ्या लेखक-कवींना
वाचल्यानंतर
तू आपले देखील म्हणणे मांड.
जर तू फक्त वाचकच राहशील
तर
ते सगळे लेखक-कवी हारतील,
शरमिंदे होतील,
ते तुला बोलायला शिकवू
शकले नाही म्हणून.
दोन
आपल्या सर्वांना
एक दिवस
एकमेकांसाठी
कविता लिहायला हवी.
पोस्टात जाऊन
प्रेमपत्रांची मदत करायला हवी.
होस्टेलमधील
कुठल्याशा बाकावर
एकटे बसलेल्या व्यक्तीला
हटकून
त्याच्याशी बोलले पाहिजे.
भेटण्याची जागा शोधणार्या
दोन लोकांसाठी
धरतीवरती
पायाएवढी जमीन का असेना
पण वेगळ्या नावाने राखली पाहिजे.
एखाद्या विद्रोहात
हक्कासाठी पेटविण्यात आलेली
एक आग-
गावातल्या विझत चाललेल्या
चूलींमधून
जिवंत राहिली पाहिजे.
आपली मुलं निरागस आहेत
आता
सर्वकाही उरो न उरो
देशात त्यांच्यासाठी
आकांक्षा तरी उरली पाहिजे.
तीन
तुला प्रेमपत्र लिहिण्यापूर्वी,
इतिहास वाचला
म्हणजे आपल्या प्रेमात
मानवी डोळ्यांमधून ओघळणारा
कुठलाही अश्रू सुटून जावा.
म्हणजे
माझ्याकडून तुला लिहिण्यात आलेला
प्रत्येक शब्द
हुकूमशहांची झोप उडवीत राहावा.
चार
काही लिहून मरावेस
कारण की
खूप सारे
मित्र आहेत-
लोक आहेत ज्यांचे तुझ्यावर
प्रेम जडणार आहे-
पण ते तुझ्या काळात
जन्मू शकले नाहीत.
लेखकांचे कैक मित्र आणि
प्रेमी असतात
लेखकाच्या जाण्याच्या नंतर.
म्हणून
काहीतरी लिहून मरावेस,
स्वतःला एखाद्या पुस्तकात
जमवून मरावेस.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
१.
अंत तक पाठक मत रहना,
सारे लेखकों कवियों को
पढ़ने के बाद
तुम अपनी बात भी रखना।
ग़र तुम पाठक भर रह गए,
तो
वो सारे लेखक-कवि हार जाएंगे-
शर्मिंदा होंगे
कि
वो तुम्हें बोलना न सीखा पाये।।
२.
हम सबको
एक रोज़
एक दूसरे के लिए
कविता लिखनी चाहिए।
डाकघर
जाकर
प्रेमपत्रों की मदद करनी चाहिए।
होस्टल की
किसी मेज पर
अकेले बैठे व्यक्ति को टोक कर
उससे बातें करनी चाहिए।
मिलने की जगह तलाशते
दो लोगों के लिए
धरती पर
पाँव भर ज़मीन ही सही
पर अलग नाम कर देनी चाहिए।
किसी विद्रोह में
हक के लिए जलाई गई
एक आग-
गाँव में बुझते चूल्हों में
जिंदा होनी चाहिए।
हमारे बच्चे मासूम हैं
अभी
सब बचे न बचे
मुल्क में उनके लिए
उम्मीद बचनी चाहिए।
३.
तुम्हें प्रेम-पत्र लिखने से पहले,
इतिहास पढा
ताकि हमारे प्रेम में
मानवीय आंखों से टपका
कोई भी आँसू छूट जाएI
ताकि मेरे द्वारा तुम्हें लिखा
हर शब्द
तानाशाहों की नींद खराब करता रहे।।
४.
कुछ लिख कर मरना।
क्योंकि बहुत से
दोस्त हैं-
लोग हैं जिन्हें तुमसे प्रेम होना है-
पर वो तुम्हारे काल में
पैदा नहीं हो पाए।
लेखकों के कई दोस्त और प्रेमी
होते हैं
लेखक के चले जाने के बाद।
इसलिए
कुछ लिख कर मरना,
अपने को किसी किताब समेट
के मरना।।
©किताबगंज
Kitabganj