आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
गुलामीला मिळे
आज चढा भाव
जो तो भाडखाव
होऊ पाहे

लाचारीने लाभे
सत्तेची तिजोरी
आणिक मुजोरी
संपत्तीची

आता देशातली
लोकशाही मेली
सुरू पायमल्ली
घटनेची

अस्मितेशी नाही
आता देणे-घेणे
मोदीशाचे मेणे
वाहताती

मराठी मातीचा
करूनी लिलाव
वैर्‍यांनी तो डाव
साधलेला

विसरले जणू
शहिदांचे रक्त
सत्तेचीच फक्त
सुटे हाव

पडला गहाण
स्वाभिमानी बाणा
मोडलेला कणा
दिल्लीपुढे

गुज्जर xड्यांचा
मुंबईला वेढा
फोडा आणि झोडा
मराठ्यांना

फितूरीचा शाप
मराठी रक्ताला
दोष परक्याला
कसा द्यावा?

सह्याद्रीचा राणा
आमुची प्रेरणा
बलाढ्य दुश्मना
चारू धूळ

इथे शिव-शंभू
अजूनी जिवंत
गुलामीचे तख्त
झुगारती

त्याच प्रेरणेने
झुंजू आणि जिंकू
अजिंक्य हा राखू
महाराष्ट्र!
🚩
          -भरत यादव
    Bharat Yadav 

१९ फेब्रुवारी २०२३
शिवजयंती
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने