कबीरा,
या देशाच्या कानाकोपर्यात
फिरलास तू!
अनेक नद्यांच्या काठी
आणि साधूंच्या मठांनी
जमवली असेल तू धुनी.
तुझ्यासोबत प्रत्येकक्षणी उपस्थित होता
तुझा फक्कडपणा आणि आत्मविश्वास,
तुझ्या तेजाने चमकणारा अनुभवांचा पेटारा,
तुझा चरखा आणि सूतसुद्धा!
कबीरा रे,
तू नाही वाचले वेदशास्त्र
हदीस आणि कुराण!
परंतू वाचले होतेस
गर्दीत सर्वात मागे उभ्या असलेल्या
माणसाचे मन
ज्याच्यासाठी तिरस्कार,हिंसा आणि
परस्पर वैरामुळे अवघड बनलेय रे
माणूस म्हणून राहाणे!
कुणी त्याला हिंदू म्हणत होते
तर कुणी मुसलमान!
कुणी त्याला गंडा-दोरे-तावीज
बांधत असे
तर कुणी भाग पाडायचे
कर्मकांड आणि अनुष्ठानासाठी!
खरेतर त्याच्याजवळ तर
भुकेशी लढण्यासाठी
किरकोळ हत्यारेदेखील नव्हती!
कबीरा,
कुठल्याही धर्मासाठी
बंद नव्हती तुझी पाठशाळा
कारण तिथे तर
खंडन केले जात असे
सर्व धर्मांमधल्या कुरीती-कुप्रथांचे!
काळजावर दगड ठेवून येत असत सगळे लोक,
काही खास आदर नाही
पंडीत अथवा मौलवीसाठी!
तू तर त्या ईश्वराला शोधत होतास
जो वसला आहे सृष्टीच्या कणाकणात
विराजमान आहे तो आम्हा सर्वांच्या आत्म्यात!
ज्याच्या सृष्टीत फरक नाहीये
सम्राट आणि गरीबात!
कबीरा,
आम्ही आजपावेतो संशोधन करीत
आहोत तुझ्या भाषेवर
कारण देशातल्या सर्व भाषा
मिसळल्या गेल्यात तुझ्या भाषेत
कधी हिला खिचडी म्हणतात
तर कधी *साधुक्कडी
ही आहेच इतकी ठाम!
कबीरा,
आम्ही अजूनही शोधत आहोत
तुझा धर्म आणि तुझी जात
जे मिसळून गेलेत
मानवतेच्या श्रेष्ठ मूल्यांमध्ये!
विसरून गेलेत त्या कथेला
जी सांगत होती
की फुलांमध्ये रूपांतरीत झाले
होते तुझे शरीर
ज्यास ना मुसलमान दफन
करू शकले
ना हिंदू दहन
करू शकले!
कबीरा,
आज खूप उदास आहे मी!
माझ्या देशातले लोक,
या देशाला
तोडण्यासाठी प्रत्येकजणाला
विचारताहेत
त्याचा धर्म आणि जात!
ते जेव्हा श्वास घेतात
तेव्हा का नाहीत विचारीत वार्याला
धर्म आणि त्याची जात?
पित असतात पाणी पण
कधी नाहीत विचारीत बरं,
आचमनात भरलेल्या पाण्याचा
धर्म वा
त्याची जात,
पण बनले आहेत स्वतःचेच वैरी!
कबीरा,
खरं खरं सांग,तुझ्या चरख्यावर
तयार झालेले कपडे परिधान करण्याआधी
कुणी ब्राह्मण विचारीत होता का रे
तुझी किंवा त्या कपड्याची जात?
आयुष्याचे गणित तर
प्रत्येक युगात समजून घेत होते लोक!
कबीरबाबा,
जळतो आहे माझा देश
प्रकट व्हावेस,
त्या मूठभर फुलांमधून
या संकटसमयी!
शब्दार्थ
*साधुक्कडी-
हिंदी आणि पंजाबीच्या
मिश्रणातून बनलेली कबीर-नानककालीन
भाषा
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कुछ तो बोलो कबीर!
कबीर,
इस देश के कोने कोने तक गए तुम!
अनेक नदियों के किनारे
और साधुओं के मठों में
जमाई होगी तुमने धूनी।
तुम्हारे साथ हर वक्त मौजूद था
तुम्हारा फक्कड़पन और आत्मविश्वास,
तुम्हारे धूप से चमकते अनुभवों का पिटारा,
तुम्हारी तकली और सूत भी!
कबीर,
तुमने नहीं पढ़े वेद शास्त्र,
हदीस और कुरआन!
लेकिन पढ़ा था
भीड़ में सबसे पीछे खड़े आदमी का मन
जिसके लिए नफरत,
हिंसा और आपसी वैर के चलते
मुश्किल हो गया होगा इंसान बने रहना!
कोई उसे हिंदु कहता था,
तो कोई मुसलमान!
कोई उसे गंडा-ताबीज बाँधता था
तो कोई बाध्य करता था
कर्मकाण्ड और अनुष्ठान के लिए!
जबकि उसके पास तो
भूख से लड़ने के लिए
मामूली हथियार भी नहीं थे!
कबीर,
किसी भी धर्म के लिए
बंद नहीं थी तुम्हारी पाठशाला
क्योंकि वहाँ तो
खंडन किया जाता था
सभी धर्मों की कुरीतियों का!
हृदय पर पत्थर रख कर आते थे सभी लोग,
कोई लिहाज़ नहीं
पंडित या मौलवी के लिए!
तुम तो उस ईश्वर को खोज रहे थे
जो बसा है सृष्टि के कण-कण में,
भास्वित है, हम सब की आत्मा में!
जिसकी सृष्टि में
फर्क नहीं है बादशाह और गरीब का!
कबीर,
हम आज तक शोध कर रहे हैं
तुम्हारी भाषा पर
क्योंकि देश की सभी भाषाएं
मिल गयीं हैं तुम्हारी भाषा में
कभी इसे खिचड़ी कहते हैं तो कभी सधुक्कड़ी
यह है ही इतनी निश्छल!
कबीर,
हम आज तक खोज रहे हैं
तुम्हारा धर्म और जाति
जो समाहित हो गए हैं
मानवता के श्रेष्ठतम मूल्यों में!
भूल गए हैं उस कहानी को
जो बताया करती थी
कि फूलों में तब्दील हो गया था तुम्हारा शरीर
जिसे न मुसलमान गाड़ सकते
न हिंदु जला सकते थे!
कबीर,
आज बहुत उदास हूँ मैं!
मेरे देश के लोग, इस देश को तोड़ने के लिए
हर किसी से पूछ रहे हैं
उसका धर्म और जाति!
वे जब लेते हैं साँस
तो क्यों नहीं पूछते हवा से
धर्म और उसकी जाति?
पीते हैं जल पर कभी नहीं पूछते,
आचमन में भरे जल का धर्म
या उसकी जाति
मगर बन गए हैं खुद के ही दुश्मन!
कबीर,
सच बताना, क्या तुम्हारी खड्डी पर बने
कपड़े को पहनने से पहले
कोई ब्राह्मण पूछता था तुम्हारी
या उस कपड़े की जाति?
जीवन का गणित तो
हर युग में समझते थे लोग!
बाबा,
जल रहा है मेरा देश,
प्रकट हो जाओ उन मुट्ठी भर फूलों से
इस आपदा की घड़ी में!
भक्त आप भगवान है, जानत नाहि अयान ।
सीस नवावै साधु कूँ, बूझि करै अभिमान ॥
[संत कबीर]
( हे अज्ञानी मनुष्य, जो दरिद्र नारायण की भक्ति में लीन है, वही भक्त भी है, और भगवान भी! तुम कितने मूर्ख हो कि पहले तो उस साधु के चरणों में आशीष की भीख पाने के लिए शीश झुकाते हो और उसके बाद अभिमान में भर कर उस साधु की जाति पूछते हो! तुम मन और बुद्धि से कितने विपन्न हो! )
©राजेश्वर वशिष्ठ
Rajeshwar Vashistha