सतरा कोटी मुस्लिमांचे पोट
मुस्लिम असल्यामुळे भरत नसते
त्यांचे पोट नमाज पढण्याने
आणि मुस्लिम टोपी परिधान करण्यानेदेखील
नाही भरत
ते मजूर आहेत
त्यांना दाबून ठेवणे
घाबरवून ठेवणे आवश्यक आहे
दंगलींच्या भयात
त्यांना मुस्लिम म्हणून राखणे गरजेचे आहे
त्यांना त्या मजूरांशी अंतर राखून ठेवणे
आवश्यक आहे
ज्यांचे पोट हिंदू असण्याने नाही भरत.
-----
अडचण
गरीब संविधान खरेदी करू शकत नाहीत
ते जरासे कमी जाड आणि स्वस्त असते तरीही नाही
जर कुणी गरीबाने खरेदी पण केले असते तरी काय
वाचले असते त्याने
समजून घेण्यासाठी ट्युटर कुठून आणले
असते त्याने
काय ट्युटरने त्याला सांगितले असते का की
त्यात कुठे लिहिले आहे
तू का गरीब आहेस ते!
------
सैतान
सैतान दिल्लीत राहातो
त्याचे कारखाने हिस्सारमध्ये असतात
त्याचे शार्प शूटर पाटण्यात झोपतात
त्याचे कार्यकर्ते कोसी नदीच्या खोर्यातल्या
गावागावात साड्या
वाटत असतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पेट
17 करोड़ मुसलमानों का पेट
मुसलमान होने से नहीं भरता
उनका पेट नमाज पढ़ने
और मुस्लिम टोपी पहनने से भी नहीं भरता
वे मजदूर हैं
उन्हें दबाकर रखना
डरा कर रखना जरूरी है
दंगों के खौफ़ में
उन्हें मुसलमान बना कर रखना ज़रूरी है
उन्हें उन मजदूरों से फासले पर रखना ज़रूरी है
जिनका पेट हिंदू होने से नहीं भरता।
दिक़्क़त
गरीब संविधान नहीं खरीद सकते
वह थोड़ा कम मोटा और सस्ता होता
तब भी नहीं
अगर कोई गरीब खरीद ही लेता तो क्या पढ़ पाता
समझने के लिए ट्यूटर कहां से लाता
क्या ट्यूटर उसे बताता
उसमें कहां लिखा है
तुम क्यों गरीब हो!
शैतान
शैतान दिल्ली में रहता है
उसके कारखाने हिसार में होते हैं
उसके शूटर पटना में सोते हैं
उसके कार्यकर्ता कोसी अंचल के गांवों में
साड़ियां बांटते हैं।
©Amitabh Bacchan
अमिताभ बच्चन