माझ्या तोंडात मिसरी होती
अचानक तुझी आठवण आली
आणि खड्यासारखी अडकली दाढेत
मी तिला काढून फेकले आणि
पुढचा घास भरला
मी मैत्रिणींसोबत होते रंगमहालात
तर दारातून डोकावत आठवणीने बोलावले
त्या दाराच्या आत होता गुडूप अंधार
मी खिडकीतून बागेत उडी मारली
स्वप्नात भरारी घेत होते तर
तुझ्या आठवणीच्या मांज्याने
पंखांना घेरले
मी त्याचा इरादा ताडला
आणि उंचच उंच गोता घेतला
मी खळखळून हसत होते
तुझी आठवण आली आणि
डोळ्यांच्या कडातून निखळली
तिला रूमालाच्या हवाली करून
मी हसण्यात मन रमवू लागले
तुझ्या आठवणीने वारंवार
जाणवून दिलेय,
कळ अजून गेलेली नाहीये
मी आठवणीचे कान पिरगाळून
तिला शेवटच्या बाकावर बसवले
प्रत्येक आठवण मोती नसतो ज्याला
अंगठीत जडवता येईल
काही आठवणींवरती एक्सपायरी डेट
गरजेची असते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मेरे मुँह में मिश्री थी
अचानक तुम्हारी याद आई
और कंकर सी फँस गई दाढ़ में
मैंने उसे निकाल फेंका और अगला निवाला भरा
मैं सखियों संग थी रंगमहल में
कि किवाड़ से झांक याद ने बुलाया
उस किवाड़ के भीतर था घनघोर अंधेरा
मैंने झरोखे से बाग में झलांग लगा दी
स्वप्न में उड़ान भर रही थी कि
तुम्हारी याद के मांझे ने पंख घेर लिए
मैंने उसके इरादे भांपे
और ऊँचा गोता लगा लिया
मैं खिलखिलाकर हँस रही थी
तुम्हारी याद आई और
आँखों के कोरों से लुढ़क पड़ी
उसे रूमाल के हवाले कर
मैंने मुस्कुराने में मन लगाया
तुम्हारी याद ने बार बार जताया
दर्द अभी गुज़रा नहीं
मैंने याद के कान मरोड़
उसे आखिरी बेंच पर बिठा दिया
हर याद मोती नहीं कि अँगूठी में जड़ ली जाए
कुछ यादों पर एक्सपायरी डेट ज़रूरी है
©श्रुती कुशवाहा
Shruty Kushwaha