कुण्या गाढवाने कधी नाही म्हटले
की तो गाढव आहे आणि
त्याला गाढव असल्याचा अभिमान आहे
त्याच्याकडेही अभिमान व्यक्त करण्याची
शंंभर कारणे असू शकतात
कुण्या गायीने,
खार,चिमणी,विंचू,सिंह
यांनीही नाही म्हटले,
मी अमुक,मी तमुक आहे
फक्त माणसाने म्हटले
आणि माणूस आजपर्यंत
हे सिद्ध नाही करू शकला
की तो माणूस आहे ते,
खरेतर माणूस कुणाला म्हणतात
हे माणसानेच ठरवलेय
कुण्या खारीने,
गायीने वा सिंहाने नव्हे
दोन हात,दोन पाय,जराशी बुद्धी आणि
जास्तीचे बोलण्याची क्षमता असणे म्हणजे
माणूस असणे नाही,
हा त्याचाच निर्णय आहे
माणूस अडकला आहे
आपल्याच जाळ्यात,
जे त्याने दुसर्यांसाठी विणले होते
त्याला श्वास घेणेदेखील
अवघड होत आहे
श्वासोश्वास वाढत चाललाय
प्राणवायू संपत चाललाय.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
किसी गधे ने कभी नहीं कहा
कि वह गधा है
और उसे गधा होने पर गर्व है
उसके पास भी गर्व करने के सौ कारण हो सकते हैं
किसी गाय, गिलहरी, चिड़िया, बिच्छू, शेर
ने भी नहीं कहा,मैं यह ,मैं वह हूँ
सिर्फ़ आदमी ने कहा
और आदमी आज तक
यह साबित नहीं कर पाया
कि वह आदमी है
जबकि आदमी किसे कहते हैं
यह आदमी ने ही तय किया
किसी गिलहरी, गाय या शेर ने नहीं
दो हाथ,दो पैर, थोड़ा दिमाग़ और ज़्यादा बोलने की कुव्वत होना आदमी होना नहीं है
यह उसी का निर्णय है
आदमी फँस गया है अपने ही जाल में
जो उसने दूसरों के लिए तैयार किया था
उसका साँस तक लेना मुश्किल हो रहा है
साँसत बढ़ती जा रही है
आक्सीजन घटती जा रही है।
©विष्णु नागर
Vishnu Nagar