संघर्ष आणि संघर्ष

संघर्ष आणि संघर्ष

संघर्ष आणि संघर्ष

जेव्हा क्रांत्या मार्क्सच्या डोळ्यासमोर
एक एक करून 'पराभूत' झाल्या होत्या!

जेव्हा मार्क्सला आपला कुठला देश नव्हता
आपले कुठले घर नव्हते
त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुले तडफडून 
मरण पावली होती
त्याची सर्वस्व असलेली 'जेनी'
त्याला सोडून निघून गेली होती!

तेव्हासुद्धा मार्क्सने क्रांतीच्या नव्या 
आवृत्तीची पटकथा लिहिणे सोडले नव्हते!

जेव्हा बोटे थकून जायची
पाय लोखंडाप्रमाणे जड होत असत
तेव्हा मार्क्स सावकाशपणे उठायचा
आणि आपल्या प्रिय मित्राला, 
समुद्राला भेटायला यायचा.
मार्क्सला पाहताच जणू समुद्र त्याची
गळाभेट घेण्यासाठी उसळायचा
आणि त्याला आपल्या प्रेमात चिंब भिजवून परतायचा.

मार्क्स आपल्या खोल डोळ्यांनी
समुद्राला असा काही बघायचा
की खळबळ माजवणार्‍या समुद्राच्या 
खोल खोल अंतरंगात लपलेल्या भविष्यातील क्रांत्यांना पाहाण्याचा 
जणू तो प्रयत्न करीत असायचा!

एके दिवशी 
अचानक तिथे बसलेल्या,
समुद्राला न्याहाळणार्‍या
एका पोक्त मजूराने विचारवंताच्या
अविर्भावात मार्क्सला असेच विचारले,
अखेर जीवनाचा अर्थ काय आहे?

मार्क्सने त्याच्याकडे खोल नजरेने पाहिले मग 
दीर्घ श्वास घेतला आणि
त्याचवेळी समुद्राची उत्तुंग लाट मार्क्सच्यादिशेने धावली!

मार्क्स त्या उसळी घेत असलेल्या
विशाल लाटेला भिडत म्हणाला,
जीवन म्हणजे,
संघर्ष! संघर्ष! आणि फक्त संघर्ष!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

जब क्रांतियां मार्क्स की आंखों के सामने
एक एक कर 'पराजित' हो चुकी थी!

जब मार्क्स का अपना कोई देश नहीं था
अपना कोई घर नहीं था
उनकी आंखों के सामने उनके बच्चे तड़प कर मर चुके थे
उनकी सब कुछ 'जेनी' 
उन्हें छोड़ कर जा चुकी थी!

तब भी मार्क्स ने क्रांति के नये संस्करण की पटकथा लिखना नहीं छोड़ा था!

जब उंगलियां थक जाती
पैर लोहे से बेजान हो जाते
तो मार्क्स धीरे से उठते 
और अपने प्यारे दोस्त समुद्र से मिलने आ जाते.
मार्क्स को देखते ही समुद्र मानो उन्हें गले लगाने को
 उछाह मारने लगता.
और उन्हें अपने प्यार में भिगो कर वापस लौट जाता.

मार्क्स अपनी गहरी आंखों से
समुद्र को इस तरह निहारते
मानो हाहाकार करते समुद्र की अतल गहराइयों में छिपी
भविष्य की क्रांतियों  को देखने की कोशिश कर रहे हो!

एक दिन
अचानक वहीं बैठे, समुद्र को निहारते 
एक बुजुर्ग मजदूर ने दार्शनिक अंदाज में 
मार्क्स से यूं ही पूछ लिया
आखिर जीवन का अर्थ क्या है?

मार्क्स ने उसकी ओर गहरी नज़र से देखा
फिर लंबी सांस भरी
और उसी समय समुद्र की विशाल लहर मार्क्स की ओर दौड़ी!

मार्क्स ने उस विशाल उछाल मारती लहर से टकराते हुए कहा
संघर्ष! संघर्ष! और सिर्फ संघर्ष!

©मनिष आझाद
Manish Azad 

(६ सितंबर १८८० को अमेरिकी मैगज़ीन 'सन' को 
दिए एक इंटरव्यू के आधार पर)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने