पूजा

पूजा

पूजा

शेठजी दररोज
सकाळ-संध्याकाळ मंदिरात जातात

देवाला प्रसन्न करण्यासाठी
देवापुढे खूप काही वाहतात
तासन् तास पूजा-अर्चा करतात

पुजारी शेठजीला फार मानतो
त्यांची विशेष काळजी घेतो

शेठजीच्या घरात
नोकर-चाकर कामास आहेत

त्यांच्यापैकी कुणी
जेव्हा कधी
आजारी पडत असतो
आणि आपल्या कामावर येऊ 
नाही शकत,तेव्हा

शेठजी पगारातून
पैसे कापून घेतात

शेठजी खूपच धार्मिक आहेत
दररोज
सकाळ-संध्याकाळ मंदिरात जातात.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पूजा

सेठ जी हर रोज
सुबह-शाम मंदिर जाते हैं

भगवान को प्रसन्न करने के लिए
ढेर सारा चढ़ावा चढ़ाते हैं
घण्टों पूजा-पाठ करते हैं

पुजारी सेठ जी को बहुत मानता है
उनका ख़ास ख्याल रखता है

सेठ जी के घर में 
नौकर-चाकर काम करते हैं

उनमें से कोई
जब कभी 
बीमार पड़ जाता है
और अपने काम पर नहीं आ पाता

सेठ जी तनख्वाह में से
पैसे काट लेते हैं

सेठ जी बहुत भक्ति-भाव वाले हैं
रोज
सुबह-शाम मंदिर जाते हैं।

©जसवीर त्यागी
Jasvir Tyagi 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने