आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
जळो ते बामणी गुरूत्व
नको गोसावड्याला महत्त्व
हिंदवी स्वराज्याचे पितृत्व
उपर्‍याला कैसे?

जिजाऊसारखी माता
महाबली शहाजी पिता
शिवबाची पराक्रमगाथा
पोरकी नाही!

राज्याभिषेकावेळी काय घडले?
तमाम दक्षिणार्थी आडवे आले
क्षत्रियत्व सिद्ध करावे लागले,
मोजूनिया होन!

शिवराय सेक्युलर होते जरी
स्वधर्माचाही अभिमान भारी
कुणाचीही धार्मिक शिरजोरी
जुमानली नाही!

मोट आवळली एकजूटीची
गनिमांविरूद्ध मावळ्यांची
साथ कणखर सह्याद्रीची,
लाभली नित्य!

लढाईसमयी जे जे भ्याले
वैर्‍यालाही सामील झाले
ते ते श्रेय लाटण्या आले,
वेळोवेळी!

मग्रूर शत्रूचा खात्मा केला
वतनदारीचा जाच संपविला
स्वकियांचाही माज उतरविला,
सहजपणे!

नित्य नव्याचा ध्यास राजाला
उभारिले हिंदवी आरमाराला
झुगारिले बुरसट समुद्रबंदीला,
वैदिकांच्या!

शेतकरी-कष्टकर्‍याला मान
थोरामोठ्यांचाही केला सन्मान
पण फुकटे-पोटार्थी-बेईमान,
पोसले नाही!

युगपुरूषांकडून घ्यावी स्फुर्ती
ढळू न द्यावी विवेकाची मती
मग असत्याचा भडिमार किती,
पर्वा नसावी!
       🚩          - भरत यादव
                 Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने