क्रांती आणि तू

क्रांती आणि तू

क्रांती आणि तू

बंदूका,बाॅम्ब 
यांच्याशिवाय देखील
क्रांती आणली जात आली आहे

मी पहिल्यांदा तुला
पाहताना क्रांतीचा आभास अनुभवला
तुला स्पर्श करताना वाटलं
जणू युद्धावरच आहे-
पाय आखडले,
मन मोडलं आणि 
हात थरथरले

त्यादिवशी जेव्हा
मी फुलं दिली तर वाटलं-
फुलं क्रांतीवर होती

काॅलेजच्या लायब्ररीत
पानं उलटवताना
वाटलं, 
क्रांती कूस बदलतेय

युद्धासाठी मैदानं होती
आणि क्रांतीसाठी तू.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

बन्दूकों , बम  के अलावा 
भी क्रांति लाया जाता रहा है -

मैंने पहली दफा तुम्हें 
देखते हुए क्रांति महसूस किया
तुम्हें छूते हुए लगा
युद्ध पर हूँ -
पैर खींचें , 
मन मरोड़ा और हाथ कांपे

उस दिन जब 
मैंने फूल दिया तो लगा -
फूल क्रांति पर थे

कॉलेज के लाइब्रेरी में
पन्ने पलटते हुए 
लगा क्रांति करवट ले रही है

युद्ध के लिए मैदान थे
और क्रांति के लिए तुम।

©मनकेश्वर.
ManKeshwar K.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने