कवितेचे व्याकरण
वरवर राव आपल्या कवितांमागे पूर्णविराम
लावत नाहीत,
आयुष्य कुठं थांबलं आहे
एखाद्या पूर्णविरामावर?
ते वाहात असतं महापूर होऊन
तोडत मोडत सर्व मरण धरणांना
पूर्णविरामाच्या जागी
वरवर राव ठेवत असतात
एक रक्ताचा थेंब
रक्ताचा तोच ठिपका
जो टपकला होता
इंद्रवेल्लीत
जो सांडला होता श्रीकाकुलम
आणि
नक्षलवाडीत
वरवर राव कवितांच्या ओळींमध्ये
काहीही रिकामे सोडत नाहीत
रिकामे कुठेयं काय?
ना धरणी ना आकाश
त्यांच्या कवितेच्या ओळींमध्ये
असते धग
धग लोक-संघर्षांची
धग लोकांक्षेची
कवितेत मात्रांऐवजी वरवर राव निवडतात मशाल
लांडग्यांसमोर तुम्ही मशाल घेऊन उभे आहात
की कविता घेऊन उभे आहात
एकच तर गोष्ट आहे.....
{ वरवर राव यांचे पुस्तक
'ये क्या जगह है दोस्तों..' वाचताना }
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
वरवर राव की कविता का व्याकरण...
वरवर राव अपनी कविता में पूर्ण विराम नहीं लगाते
जीवन कब रुका है किसी पूर्ण विराम पर..
वह तो बहता है सैलाब बनकर....
तोड़ता हुआ मृत्यु के समस्त बांधों को........
पूर्ण विराम की जगह
वरवर राव रख देते हैं रक्त की एक बूंद
रक्त का वही कतरा जो गिरा था इन्द्रवेल्ली में
जो गिरा था श्रीकाकुलम और नक्सलबाड़ी में...
वरवर राव कविता की पंक्तियों के बीच कुछ भी खाली नहीं छोड़ते
खाली कहाँ है कुछ भी
न धरती न आकाश
उनकी कविता की पंक्तियों के बीच होती है आंच
आंच जन-संघर्षों की,
आंच जन-आकांक्षाओं की
कविता में मात्राओं की जगह वरवर राव चुनते हैं मशाल
भेड़ियों के सामने आप मशाल लेकर खड़े हों
या खड़े हों यह कविता लेकर
एक ही बात है.....
(वरवर राव की किताब 'ये क्या जगह है दोस्तो..' पढ़ते हुए)
Manish Azad
©मनिष आझाद