कीव वाटते अशा देशाची

कीव वाटते अशा देशाची

कीव वाटते अशा देशाची...

कीव वाटते अशा देशाची,
जिथे लोक मेंढरं आहेत आणि
त्यांचा मेंढपाळ त्यांची दिशाभूल
करीत असतो

कीव वाटते अशा देशाची,
ज्याचे पुढारी खोटारडे आहेत
ज्याच्या बुद्धीवंतांना गप्प करण्यात आलेय 
आणि ज्याचे धर्मांध वायूलहरींवर 
प्रेतांप्रमाणे घोंगावत असतात

कीव वाटते अशा देशाची,
जो विजेत्यांचे कौतुक करणे आणि 
गुंडांना नायक मानणे आणि 
ताकद व छळाच्या मदतीने 
जगावर सत्ता गाजविण्याचा 
प्रयत्न करण्याशिवाय
कधीही आपला आवाज उठवत नाही

कीव वाटते अशा देशाची,
ज्याला आपल्या भाषेशिवाय कुठली 
अन्य भाषा येत नाही आणि 
ज्याला आपली संस्कृती सोडून कुठली 
दूसरी संस्कृती ठाऊक नाही

कीव वाटते अशा देशाची,
पैसा ज्याचा श्वास आहे आणि 
जो खाऊन-पिऊन 
झोपा 
काढत असतो

कीव वाटते अशा देशाची,
अरेरे,अशा लोकांची, 
जे आपल्या हक्क-अधिकारांना समाप्त 
होऊ देतात 
आणि 
आपल्या स्वातंत्र्याला
वाहून जाऊ देतात.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

हिंदी अनुवाद
प्रकाश के राय
Prakash K Ray

लॉरेंस फ़र्लिंगहेटी के जन्मदिन पर

 तरस आता है उस देश पर

तरस आता है उस देश पर जहाँ लोग भेड़ें हैं और जिन्हें उनका गड़ेरिया भटकाता है. 

तरस आता है उस देश पर जिसके नेता झूठे हैं जिसके मनीषियों को चुप करा दिया गया है और जिसके धर्मांध वायुतरंगों पर प्रेतों की तरह मंडराते हैं. 

तरस आता है उस देश पर जो विजेताओं की प्रशंसा करने और दबंग को नायक मानने और ताक़त व यातना के ज़रिये दुनिया पर राज करने की कोशिश के अलावा कभी भी अपनी आवाज़ नहीं उठाता. 

तरस आता है उस देश पर जिसे अपनी भाषा के अलावा कोई और भाषा नहीं आती और जिसे अपनी संस्कृति को छोड़कर किसी और संस्कृति का पता नहीं. 

तरस आता है उस देश पर पैसा जिसकी साँस है और जो खाये-अघाये की नींद सोता है. 

तरस आता है उस देश पर, 
आह, उन लोगों पर जो अपने अधिकारों को ख़त्म होने देते हैं और अपनी आज़ादी को बह जाने देते हैं.

मूळ इंग्रजी कविता
Lorence Furlighety
लॉरेंस फ़र्लिंगहेटी
{मेरे देश, तुम्हारे आँसू प्यारी धरती आज़ादी की!} 
(आफ़्टर खलील जिब्रान,२००७)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने