....नाही गुलाम अजून

....नाही गुलाम अजून

.....नाही गुलाम अजून!
🚩
ईडी-धाडीच्या भयाने
बंद, वाचाळांची तोंडे
कुणी सत्तेसाठी मिंधे
कुणी नाचविती झेंडे

कधीकाळी मराठीचा
ज्यास येतसे पुळका
तोच आता चघळतो
धर्मा-धर्माच्या खारका

मर्‍हाटीपणाचा तोरा
कसा मिरवावा आता
मती गुंग दिल्लीपुढे
फेकी हिंदुत्वाचा पत्ता

जनतेने मनातून
दिले त्यास हाकलून
भाऊबंदकीचा वाद
तेच रटाळ भाषण

तुला नको मला नको
करा कुत्र्यांचीच धन
दिल्लीपुढे उभे राहा
हात बांधून-वाकून

बारा कोटी मराठ्यांची
पडे अस्मिता गहाण
गुज्जरxड्यांपुढे बा
सपशेल लोटांगण!

गडकिल्ल्यांसाठी प्रेम
येई व्यर्थ उफाळून
ना जनतेशी देणे-घेणे
नाही सत्याशी इमान

शिवबाचे शिलेदार
नाही कधी फसणार
शिवप्रेमाचे बेगड
उद्या नाही दिसणार

मराठीची मान जाय
फासामध्ये अडकत
स्वार्थी पक्ष-पुढार्‍यांचे
झेंडे र्‍हाती फडकत

लाख आक्रमणे अशी
आम्ही दिली झुगारून
स्वाभिमानी महाराष्ट्र
नाही गुलाम अजून
🚩
               -भरत यादव
         Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने