आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
धरावे बा आता
आजोबांचे बोट
वडिलांचा कोट
उतरवावा

हिंदुत्वाची आग
जाळी सहिष्णुता
तुडवी समता
पायदळी

विविधता हीच
ताकद आपली
नाही एककल्ली
परंपरा

गंगा-यमुनेचा
संगम जाहला
तेव्हा हा बनला
हिंदोस्तान

सोडूनी अस्सल
वारसा आपला
अजूनी जपला?
माफीवीर

गांधींच्या खूनाचा
कट-कारस्थानी
प्रतिक बामणी
झिडकारा

गोडसेचा गुरू
हवाच कशाला?
असता उशाला
प्रबोधन

वर्णवर्चस्वाचा
कुविचार दिला
सुप्तपणे केला
शिवद्वेष

देशउभारणीत
शून्य योगदान
तेच आज ज्ञान
पाजळती

षंढ प्रतिकांना
मानूनी आदर्श
खोटा इतिहास
पढवती

संघोटे तमाम
वैरी भारताचे
मनोमन डाचे
लोकशाही

जागे व्हा उद्धवा
जागवा विवेका
शत्रू-मित्र जोखा
आतातरी

बोकांडी बैसला
कोण तो वेताळ
समय नि काळ
ओळखावा

पेरायला नको
मतांसाठी द्वेष
पुनःपून्हा देश
नासू नये!
🚩
         -भरत यादव
       Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने