कवी आणि कविता

कवी आणि कविता

कवी आणि कविता

मी पहिली ओळ लिहितो
आणि 
घाबरून जातो राजाच्या शिपायांना,
ओळ खोडून टाकतो

मी दूसरी ओळ लिहितो आणि
घाबरून जातो गनिमीकाव्याने लढणार्‍या विद्रोह्यांना,
ओळ खोडून टाकतो

मी आपल्या जीवाच्या भीतीने
आपल्या हजारो ओळींचा
अशाप्रकारे खून केला आहे
त्या ओळींचे आत्मे
नेहमी माझ्या चहूबाजूंनी घोंगावत राहातात आणि 
मला म्हणतातः कवीवर!,
कवी आहात की 
कवितेचे मारेकरी

ऐकले होते,
न्याय करणारे झालेत कितीक 
न्यायाचे मारेकरी,
धर्माचे राखणदार पण ऐकले होते
कैक होऊन गेलेत स्वतः धर्माच्या पवित्र आत्म्याचा खून करणारे,

फक्त हेच ऐकायचे राहिले होते
आणि हेही ऐकले की
आमच्या काळात भीतीमुळे
कवीसुद्धा झालेयत
कवितेचे मारेकरी

मूळ हिंदी कविता

मैं पहली पंक्ति लि‍खता हूँ
और डर जाता हूं राजा के सिपाहियों से
पंक्ति को काट देता हूँ

मैं दूसरी पंक्ति लिखता हूँ
और डर जाता हूं गुरिल्‍ला बागियों से
पंक्ति को काट देता हूँ

मैंने अपनी जान की खातिर
अपनी हजारों पंक्तियों की
इस तरह हत्‍या की है
उन पंक्तियों की रूहें
अक्‍सर मेरे चारों ओर मंडराती रहती हैं
और मुझसे कहती हैं: कविवर !
कवि हो या कविता के हत्‍यारे

सुना था इंसाफ करने वाले हुए कई इंसाफ के हत्‍यारे
धर्म के रखवाले भी सुना था कई हुए
खुद धर्म की पावन आत्‍मा की
हत्‍या करने वाले

सिर्फ यही सुनना बाकी था
और यह भी सुन लिया
कि हमारे वक्‍त में खौफ के मारे
कवि भी हो गए
कविता के हत्‍यारे

©सुरजीत पातर
Surjit Patar
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने