नाव मिळतेजुळते असू शकते
चेहरा आणि पेहरावसुद्धा
पण माझा राम तुझ्या रामापेक्षा
एकदम वेगळा आहे
माझ्या रामाचे राज्य
तेव्हापासून आहे,
जेव्हा जीवन होते धर्म नव्हे
रंग होते वस्त्र नव्हे
भाषा होती भजन नव्हे
श्रद्धा होती कर्मकांड नव्हे
मन होते मंदिर नव्हे
माझ्या रामाला सीमा माहित नाहीत
त्याच्या नावावर कत्तली घडत नाहीत
त्याला निवडणूकीत पत्रकांप्रमाणे
वाटले जात नाही
माझा राम तो आहे
ज्याला अल्लामा इक्बाल
इमाम-ए-हिंद म्हणतात
माझा राम सुळावर चढला आहे
गुरूव्दारांमध्ये लंगर शक्य करतो आहे
उजेड आणि वार्याप्रमाणे
माझा राम कुणाच्या ताबेदारी आणि
पकडीपासून एकदम मुक्त आहे
🍁
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
इमाम-ए-हिंद
हो सकता है नाम मिलता हो
शक्ल और पहनावा भी
लेकिन मेरा राम तुम्हारे राम से
बिल्कुल अलग है
मेरे राम का राज्य तब से है
जब जीवन था धर्म नहीं
रंग थे वस्त्र नहीं
भाषा थी भजन नहीं
आस्था थी कर्मकाण्ड नहीं
मन था मंदिर नहीं
मेरा राम सरहदें नहीं जानता
उसके नाम पर कत्ल नहीं होते
उसे चुनाव में पर्चों की तरह नहीं बाँटा जाता
मेरा राम वो है
जिसे अल्लामा इक़बाल इमाम-ए-हिंद कहते हैं
मेरा राम सलीब पर चढ़ा है
संभव कर रहा है गुरुद्वारों में लंगर
रौशनी और हवा की तरह
मेरा राम किसी की जकड़ और पकड़ से
एकदम मुक्त है।
©शेफ़ाली शर्मा
Shefali Sharma