प्रसुतीगृहाला उद्धवस्त करण्यापूर्वी
रशियन सैनिक
युक्रेनच्या गर्भवती महिलेला म्हणाला,
आमच्याकडच्या बायका
गर्भातच घेऊन फिरतात
बाॅम्ब आणि ग्रेनाईड
आमच्या देशातल्या तरूणांचं नाव आहे 'बाॅम्ब'
आणि तरुणींचं नाव 'ग्रेनाईड'
युक्रेनची गर्भवती महिला
सगळे काही कानानिराळे टाकत
गर्भातल्या अर्भकाला बोलली,
जरा थांब हं माझ्या बाळा..
बाॅम्बवर्षाव होऊ दे...
बरोब्बर बाॅम्बवर्षाव होताना तू ये..
तुझे नाव मी ठेवीन,
पाऊस...
ती रशियन सैनिकाला म्हणाली,
युक्रेनच्या युवतींचे नाव आहे
'पाऊस'
आणि युवकांचे नाव
'ऊन'....
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
हिंदी अनुवाद
यूक्रेन
मैटरनिटी वार्ड को ध्वंस करने से पहले
रशियन सैनिक ने
यूक्रेन की गर्भवती स्त्री से कहा
हमारे यहाँ की स्त्रियाँ
गर्भ में ही लिए फिरती हैं
बम और ग्रेनाइट
हमारे देश के युवाओं का नाम है 'बम'
और युवतियों को नाम 'ग्रेनाइट'
यूक्रेन की गर्भवती स्त्री ने
सब कुछ अनसुना करते हुए
गर्भ के शिशु से कहा
जरा सा ठहर जा मेरे बच्चे
बम वर्षा होने दे
ठीक बमों की वर्षा के मध्य तुम आना
तुम्हारा नाम मैं रखूँगी
बारिश ....
उसने रशियन सैनिक से कहा
यूक्रेन की युवतियों का नाम है
'बारिश' ..
और युवाओं का नाम
'धूप'....
हिंदी अनुवाद
हरकीरत हीर
मूळ बंगाली कविता
निलीम कुमार
Nilim Kumar