आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
कावळ्यांच्या हाती
कारभार दिला
त्यांनी घाण केला
दरबार

इतिहास करी
ज्यांचा उपहास
सुरू अट्टाहास
त्यांचा आज

शत्रूपुढे ज्यांनी
तुकविल्या माना
लाचारून प्राणा
वाचवले

ज्यांचे बापजादे
माफीनामेवाले
कायम झुकले
सत्तेपुढे

क्रांतीकारकांची
नावे सांगितली
फितुरी बा केली
मायभूशी

त्यांच्याच औलादी
जाहल्या मुजोर
द्वेषाचा विखार
फैलावती

वाढावी पैदास
क्रूर टाळक्यांची
सत्तेची ही खुर्ची
जावू नये!

नको लोकशाही
नको संविधान
मुर्खांचे थैमान
राहो जारी!

एकमेव हाच
ठेऊनी उद्देश
हिटलरी पाश
आवळती

खरा इतिहास
दडवू पाहती
खोट्याची महती
पढविती

होते एके काळी
कलम कसाई
शेंदाड शिपाई
आले आता

नमोयुगा तुझी
असत्याला साथ
सत्य बासनात
गुंडाळले!
🚩
        -भरत यादव
     Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने