प्रेम खूपच सोप्पं आहे-
फारच सुविधेचे देखील
तुम्ही एखाद्यावर उघडपणे
सर्वकाही सांगून प्रेम करू शकता
किंवा आयुष्यभर मौन
बाळगूनसुद्धा
तुम्हाला वाटलं तर
कुणाचा होकार मिळाल्यावर
करू शकता प्रेम
आणि
नकार असला तरी
तुम्हाला कुणी अडवू शकत नाही
प्रेम करण्यापासून
तुम्ही थांबलेल्या लोकांवर प्रेम करा,
वा
त्यांच्यावर देखील,
जे निघून गेले आहेत पुढे-
आणि आता नजरेस पडत नाहीत
तुम्ही एका दिवसाकरिता
प्रेमात पडू शकता-
वर्ष- दोन वर्षे सुद्धा
किंवा
एखादे शतकभर पण लावू शकता,
प्रेमामध्ये
पाहा बरं!
किती सरळ-सुविधापूर्ण आहे
प्रेम.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
प्रेम बहुत ही आसान है-
बेहद सुविधाजनक।
तुम किसी को खुलेआम
सब बता कर प्रेम कर सकते हो।
या ताउम्र चुप्पी बना कर
प्रेम कर लो।
तुम चाहो,
किसी की हाँ-होने के बाद
करो प्रेम।
और
ना होने पर भी
तुम्हें कोई रोक नहीं सकता प्रेम से।
तुम रुके हुए लोगों से प्रेम करो,
या
उनसे जो आगे बढ़ गए-
और अब नज़र नहीं आते।
तुम एक रोज़ के लिए
प्रेम में हो सकते हो-
साल-दो साल भी
या
एक सदी भर भी लगा सकते हो।
देखो!
कितना सरल-सुविधाजनक है
प्रेम।।
©किताबगंज
Kitabganj