कवी,तू कुठे होतास?

कवी,तू कुठे होतास?

कवी, तू कुठे होतास?

ज्या काळात 
वातावरण तापले होते
तू डोंगरावर निघून गेला होता

ज्या काळात
धर्माचा अर्थ हिंदू
आणि मजहबचा अर्थ मुसलमान असा सांगितला 
जाऊ लागला
तुझे शब्दकोष कुणीतरी मागून घेऊन गेला होता

ज्या काळात
कवितेला डोंगर,नदी,जंगल,जमीन यावर उत्साहाने चित्कारायचे होते,
लढायचे होते
तू कुठल्याशा ग्रंथाला पवित्र म्हणून
डोळ्यांनी चुंबीत होतास

ज्या काळात
देशाच्या जाणीवेत विष भरले जात होते
तुझ्या सत्तेचे यशोगान गाणारे नवे पुस्तक अमॅझोनवर विकले जात होते

ज्या काळात
विद्यापीठात जाणार्‍या मुलींच्या
ब्लाऊजमध्ये उघडपणे हात घातले जात होते
तू राष्ट्रवाद स्थापनेचे गीत लिहित राहिलास

ज्या काळात
किंकाळी कवितेत जागा मागत होती
तू कविता नाही गाऊ शकलास

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कहाँ थे कवि तुम

जिन समयों में
माहौल गर्म था
तुम पहाड़ पर गए हुए थे

जिन समयों में
धर्म का अर्थ हिन्दू
और मजहब का मतलब  मुसलमान कहा जाने लगा
तुम्हारे शब्दकोष कोई मांग कर ले गया था

जिन समयों में
कविता को पहाड़, नदी, जंगल, जमीन में भर उत्साह चीखना था, लड़ना था
तुम किसी किताब को पवित्र कह
आंखों चूम रहे थे

जिन समयों में
मुल्क की चेतना में ज़हर भरा जा रहा था
तुम्हारी सत्ता के यशोगान गाती नई किताब
अमेजन पर बिक रही थी

जिन समयो में  यूनिवर्सिटी जाती  लड़कियों के

ब्लाउज में सरेआम हाथ डाले जा रहे थे

तुम राष्ट्रवाद का स्थापना गान लिखते रहे 

जिन समयों में
चीख कविता में जगह मांग रही थी
तुम कविता नही कह सके

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने