बा तथागता

बा तथागता

बा तथागता!

बा तथागता,
तुझी वाट बघता बघता
कितीतरी शतकं उलटून गेलीयत
किती दिवस आणि कितीक रात्री
उलटून गेल्यात

परंतू ज्या मार्गाने तुला यायचं होतं
तिथून कुणी दूसराच आला आहे

तुझ्या करुण हाकेच्या ऐवजी
पुष्यमित्राची ललकारी आली आहे
निरंजनेच्या पाण्याऐवजी
शरयूची रक्तधार आली आहे
धम्मचक्राच्या अमृताऐवजी
विषचक्राचे तुषार आले आहेत

असे का घडणार नाही?

असेच घडणार होते,
आम्ही तुला फक्त स्वप्नात मागितले
पण जमिनीवर मार्ग नाही बनवला

प्रत्येक वेळेस तुला विसरून
आम्ही पुष्यमित्राची गाणी गायिली
प्रत्येक पर्वात सणासुदीला सजून
तुझ्या मारेकर्‍यांची हत्यारे सजवली

तुझ्या मौन आणि 
रोकड्या उत्सवाला विसरून
आम्ही उधार अर्धवट खेळ रचले
तू दिलेले अत्तदीप विझवून
आम्ही खोटे दीपोत्सव साजरे केले
तुझ्या ध्यानाला आणि श्रमाला विसरून 
आम्ही याचनेचे सूर सजवले
तुझ्या या लोकाला दुर्लक्षून
आम्ही परलोकाची स्वप्नं सजवली
तुझ्या धाडसी तर्काला त्यागून
आम्ही भक्ती आणि देव मानले

आता या सगळ्याच्या नंतर

जो मार्ग तुझ्यासाठी बनूच 
शकला नाही
त्यावरून तू येणार होता तरी कसा?

आमच्या मुर्खपणाने आणि अडाणचोटपणाने
ज्याच्याकरिता मार्ग विणला होता
तोच आता येऊन पोहोचला आहे...

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता
अहो तथागत 
तुम्हारी बाट जोहते हुए 
कितनी सदियाँ बीत गयीं 
कितने दिन और कितनी रातें बीत गयीं 

लेकिन जिस मार्ग से तुम्हे आना था 
वहां से कोई और ही चला आया है 

तुम्हारी करुण पुकार की जगह 
पुष्यमित्र की ललकार आई है 
निरंजना के नीर की जगह 
सरयू की रक्तधार आई है 
धम्मचक्र के अमृत की जगह 
विषचक्र की फुहार आई है 

ऐसा हो भी क्यों नहीं 

ऐसा होना ही था 
हमने तुम्हें केवल स्वप्न में मांगा 
लेकिन जमीन पर मार्ग न बनाया 

हर मौके पर तुम्हें भुलाकर  
हमने पुष्यमित्र के गीत गाये 
हर पर्व हर त्यौहार में सजकर 
तुम्हारे हत्यारों के हथियार सजाये 

तुम्हारे मौन और नकद उत्सव को भूलकर 
हमने उधार अधूरे खेल रचाए 
तुम्हारे दिए अंतर्दीप बुझाकर  
हमने झूठे दीपोत्सव मनाये 
तुम्हारे ध्यान और श्रम को भूलकर 
हमने याचना के सुर सजाये 
तुम्हारे इस लोक को दुर्लक्ष्य कर 
हमने परलोक के स्वप्न सजाये 
तुम्हारे साहसी तर्क को तजकर 
हमने भक्ति और भगवान मनाये 

अब इस सबके बाद 

जो मार्ग तुम्हारे लिए बन ही न सका 
उस पर तुम आ भी कैसे सकते थे?

हमारी मूढ़ता और जहालत ने 
जिसके लिए मार्ग बुना था 
वही अब आ पहुंचा है ...

©संजय श्रमण
Sanjay Shraman
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने