धर्म सांगणार आम्ही

धर्म सांगणार आम्ही

धर्म सांगणार आम्ही!
🚩
रेवदंड्याचा गुलाम
मी मॅट्रिक पास आहे
स्वाभिमानशून्य मिंधे
आप्पा-स्वारीचा दास आहे

भटा-बामनांची सेवा
थेट वैकुंठाला नेई!
रामदासी बैठकांची
किती वर्णावी पुण्याई!

सेवाधर्म दिव्य आहे
बुवा-बापूंचा सांगावा
मेंदूमध्ये भरलेला
धर्मनिष्ठेचा कांगावा

उष्माघाताने जनता
मरो तडफडून जरी
लाळ गळे सत्तेसाठी
आणि सुटेना चाकरी

किती पुण्यसंचय तो
मतदाता मागे येतो
'श्री'सदस्यांसाठी असा
धर्माधिकारी जन्म घेतो

'धर्म सांगणार आम्ही
तुम्ही डोलवाव्या माना'
नाचणार पेशवाई
डोईवर पुनःपून्हा!

अल्पशिक्षणाने अशी
शोचनीय स्थिती केली
विवेकाला अव्हेरले
समाजाची माती झाली

अडाणचोट सरावले
निर्ढावले खुर्चीसाठी
लोकशाही मूकपणे
खाई पोलिसांची काठी
🚩
                -भरत यादव
           Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने