त्याचं एकच काम होतं
मालकाची पुस्तकं पुसायची
अन् पुन्हा त्यांना ठेवत जायचं
जी एक नव्हे असंख्य होती
आळीपाळीने त्याच्या हातात यायची
पुन्हा कपाटात ठेवली जायची
तो सजवता सजवता वैतागायचा नाही
वैतागायचा यासाठी की एकसुद्धा वाचू नाही शकत
वैतागायचा की त्याच्याजवळ केवळ धूळ
आणि
ज्ञान मालकाच्या मेंदूत
तो वैतागत राहिला तोवर
जोवर काम करण्यासाठी सक्षम नाही राहिला
अखेरच्या दिवशी मुलांची काही काॅमिक्स चोरून घरी घेऊन आला आपल्या मुलांसाठी
त्यांना निरक्षर पासून साक्षर बनविण्यासाठी
ही चोरी नव्हती
जणू असा पुरस्कार
जो मालकाने कधी दिला नाही!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पुरस्कार
उसका एक ही काम था
मास्टर की किताबें पोंछना
फिर वापस उन्हें रखते जाना
जो एक नहीं असंख्य थीं
बारी-बारी से उसके हाथों में आतीं
वापस सेल्फ में रख दी जातीं
वह सजाते-सजाते नहीं था परेशान
परेशान था कि एक को भी पढ़ नहीं पाता
परेशान था कि धूल केवल उसके पास
ज्ञान मास्टर के दिमाग में
वह परेशान रहा उस दिन तक
जब काम करने लायक नहीं रहा
अंतिम दिन बच्चों की कुछ कॉमिक्स चुरा कर
घर ले आया अपने बच्चों के लिए
उन्हें निरक्षर से साक्षर बनाने के लिए
यह चोरी नहीं थी
बल्कि वैसा पुरस्कार
जो मास्टर ने कभी नहीं दिया!
©नरेश अग्रवाल
Naresh Agarwal