सूर्य म्हणत आहे
जेव्हा पृथ्वी माझ्यापासून तोंड
फिरवायला लागेल
तुम्ही मला आठवा
माझ्याबद्दल बोला
प्रकाशाबद्दल बोलत राहा
जेव्हा सगळीकडे अंधार असेल
जेव्हा कापले जात असतील
हात आणि पाय
बरोब्बर त्याचवेळी
पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागा
कारण फांद्या आणि मूळांचे
कापले जाणे म्हणजे
झाडाचा मृत्यू नसतो
आणि जेव्हा बोलण्यास मनाई असेल
बरोब्बर त्याच वेळी
गुणगुणत राहा
काही सुरावटींना शब्दांची गरज नसते
गर्दीसाठी गरजेचे आहे
फक्त तुमचे एकट्याने चालू लागणे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
गुनगुनाओ
सूरज कहता है
जब पृथ्वी मुझ से मुँह मोड़ रही हो
तुम मुझे याद करना, मेरी बात करना
बात करना रौशनी की
जब हर तरफ़ अंधेरा हो
जब काटे जा रहे हों हाथ और पैर
ठीक उसी वक्त
जुट जाना अगले सफ़र की तैयारी पर
कि टहनियों और तने का कट जाना
पेड़ की मृत्यु नहीं होती
और जब बोलने की मनाही हो
ठीक उसी वक्त
गुनगुनाओ
कुछ धुनों को शब्दों की ज़रूरत नहीं
भीड़ के लिए ज़रूरी है
बस तुम्हारा अकेले चल पड़ना।
©शेफ़ाली शर्मा
Shefali Sharma