तुमच्या इतिहासात

तुमच्या इतिहासात

तुमच्या इतिहासात

तुमच्या इतिहासात कुणी आर्य नव्हते 
जे वेगवान घोड्यांवर स्वार होऊन घुसले होते भारतात
भारताला चिरडत,
कालौघात जे पुढे
शेतांमध्ये नांगर चालवत राहिले
नदीत कंबरेएवढ्या पाण्यात डुंबून मंत्र 
पुटपुटायला लागले

तुमच्या इतिहासात कुणी मुघल नव्हते
ना त्यांची कुठली राजवट होती 
तीनशे वर्षांची
ना नंतरच्या दिवसात कुण्या पत्रकाराला त्यांचा कुणी वंशज सापडला होता
हावडा पुलावर भिक मागताना
भिकारी होऊनदेखील जे गेले नव्हते कुठे, 
कारण जगामध्ये भारतच त्यांचा देश होता त्यांचे घर होते
समाधीस्थळे त्यांच्या पूर्वजांची इथेच होती
कुठे जाणार ते
सर्व काही गेल्यानंतरसुद्धा 
त्यांचे विश्व इथेच होते

तुमच्या इतिहासात
कुणी इंग्रज आले नव्हते
ना गुलाम बनवून ठेवले होते आपल्याला दोनशे वर्षांपर्यंत आणि जेव्हा ते आलेच नव्हते तर 
ना कुठले १८५७ घडले 
ना १९१९ 
ना १९४२ 
ना १९४७
ना कुणी गांधी झाले 
ना त्यांचा खून पडला
ना कुणी त्यांचा खूनी नथुराम गोडसे होता

तुमच्या इतिहासात
कुठली बाबरी मशिद पाडलीच गेली नाही कधी 
कुठले गोध्रा घडले नाही
कुठली दंगल घडली नाही
ना स्नुपगेट घोटाळा झाला
राजधर्माचा धडा कुणी कुणाला शिकविलाच नाही

पाकिस्तानात १९४७ च्यापूर्वीचा इतिहास पाठ्यक्रमाच्या बाहेर आहे
म्हटले गेले होते की तो भारताचा इतिहास आहे
आम्हाला भारतात २०१४ च्या आधीचा इतिहास वाचू दिला जाणार नाही
आम्हाला सांगितले जाईल की
तो हिंदुराष्ट्र बनण्यापूर्वीचा इतिहास आहे

परंतू याचा अर्थ असा नाही की 
२०१४ च्या नंतरचा इतिहास उघडून ठेवला जाईल आपल्यापुढे
पुसले गेले आहे सगळे
मैलो न् मैल चालत चालत घरी परतणार्‍या मजूरांची गर्दी 
इतिहासाच्या बाहेर गेली आहे
बॅंकांसमोरील पै पै ला तरसणार्‍या
रांगांमध्ये उभ्या मरणार्‍या लोकांची कहाणी,
कधी ऐकवली जाणार नाही
ना हजारो प्रेतं मिळतील वाहत्या नदीत
नाही गवसणार कुठल्या षड्यंत्राचे राजकारण
पुलवामा नकाशातून गायब असेल
दंगलीतील दीर्घ चित्कारांना 
रामचरितमानसमधल्या ओव्यांनी
दडपून टाकले जाईल
कुठली हत्यासुद्धा सापडणार नाही
तिथे लोयांचा नामोल्लेख नाही आढळणार
नाही मिळणार कुठे 
आसिफा,
गौरी लंकेश,पानसरे,दाभोलकर,
कलबुर्गी
ही सगळी इतिहासाच्या पुस्तकातून
पुसली गेलेली नावंं आहेत

तो पुसत चाललाय 
आपल्या प्रत्येक पाऊल ठशांना
तो जिथे जाऊ पाहातोय
तिथे महामुर्खच विचार करतात जाण्याचा
तो ज्या मार्गावरून जात आहे
मुर्खालाही कधी वाटणार नाही
की इतिहासात त्याचे ठसे मिळावेत म्हणून

आपण पाकिस्तानपेक्षाही 
वाईट पाकिस्तानच्या दिशेने जात आहोत
आपण एका इतिहासशून्य काळात जगत आहोत
इतिहासाआधी आपले भविष्य पुसण्यात आले आहे
आपण एका थबकलेल्या काळाबरोबर सावकाशपणे
बेपत्ता लोकांच्या लांबच लांब रांगेत बदलत चाललो आहोत
बर्फाच्या लादीसारख्या मुर्दाड काळाने
आपल्याला आपल्यात सामावून घेतले आहे

आमचा श्वास
इतिहासाच्या दुमडलेल्या पानांमध्ये
कुठेतरी अडकून पडला आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

तुम्हारे इतिहास में

तुम्हारे इतिहास में
कोई आर्य नहीं था जो तेज भागते घोड़ों पर सवार
घुसा था भारत में भारत को रौंदता
समय बीतने के साथ जो
खेतों में हल चलाने लगा था
नदी में कमर भर पानी में डूबकर मंत्र पढ़ने लगा था

तुम्हारे इतिहास में कोई मुगल नहीं था
न उनका कोई शासन था तीन सौ सालों का
न बाद के दिनों में किसी पत्रकार को 
उनका कोई वंशज मिला था
हावड़ा में भीख मांगता
भीखारी होकर भी जो नहीं गये थे कहीं
इसलिए कि दुनिया में
भारत ही उनका देश था उनका घर था
मकबरे उनके पुरखों के यहीं थे
कहाँ जाते वो
सबकुछ खो जाने के बावजूद उनका संसार यहीं था

तुम्हारे इतिहास में 
कोई अंग्रेज नहीं आया था
न गुलाम बना रखा था हमें दो सौ वर्षों तक
और जब वह आया ही नहीं 
तो न कोई 1857 हुआ
न 1919, न 1942, न 1947 
न कोई गांधी हुआ था न उसकी हत्या हुई थी
न कोई उसका हत्यारा नाथूराम गोडसे हुआ था

तुम्हारे इतिहास में
कोई बाबरी मस्जिद गिरायी ही नहीं गयी कभी
कोई गोधरा हुआ ही नहीं
कोई दंगा हुआ ही नहीं
न स्नूपगेट कांड हुआ
राजधर्म का पाठ किसी ने किसी को पढ़ाया ही नहीं

पाकिस्तान में 1947 से पहले का इतिहास
पाठ्यक्रम से बाहर है
कहा गया कि वह भारत का इतिहास है
हमें भारत में 2014 से पहले का
इतिहास पढ़ने नहीं दिया जाएगा
हमसे कहा जाएगा वह हिंदूराष्ट्र बनने से पहले का
इतिहास है

लेकिन इसका अर्थ यह नहीं 
कि 2014 के बाद का इतिहास खोलकर
रख दिया जाएगा आपके सामने
मिटाया जा चुका है सब
मीलों मील चलकर घर लौटते मज़दूरों का हुजूम
इतिहास से बाहर हो चुका है
बैंकों के सामने पाई पाई को तरसते
कतारों में खड़े मरते लोगों की कथा 
कभी सुनायी नहीं जाएगी
न हज़ारों लाशें मिलेंगी नदी में बहती
नहीं मिलेगा कोई षड्यंत्र न मिलेगी षड्यंत्र की राजनीति
पुलवामा नक्शे से गायब होगा
दंगों की लंबी चीखों को 
रामचरितमानस की चौपाइयों से दबा दिया जाएगा
कोई हत्या भी नहीं मिलेगी
वहाँ लोया का नामोल्लेख नहीं मिलेगा
नहीं मिलेगी कहीं आसिफ़ा
गौरी लंकेश पनसरे दाभोलकर कलबुर्गी
ये सब इतिहास की किताब से मिटा दिये गये नाम हैं

वह मिटाता चल रहा है अपने हर कदम के निशाँ
वह जहाँ जाना चाह रहा है
वहाँ प्रचंड मूर्ख ही सोचते हैं जाने का 
वह जिन रास्तों से होकर जा रहा है
मूर्ख भी नहीं चाहते
कि इतिहास में उसके चिह्न मिले

हम पाकिस्तान से बदत्तर पाकिस्तान की ओर बढ़ रहे हैं
हम एक इतिहासविहीन समय में जीते चले जा रहे हैं
इतिहास से पहले हमारा भविष्य
मिटाया जा चुका है
हम एक ठहरे हुए समय के साथ
आहिस्ता आहिस्ता
गुमशुदा लोगों की लंबी कतार में तब्दील होते जा रहे हैं
बर्फ की सिल्ली सा मुर्दा समय
हमें अपने अंदर समाहित कर चुका है

हमारी साँसें 
इतिहास के मुड़े पन्नों में कहीं
अटकी पड़ी हैं।

©Ranjit Verma
रंजीत वर्मा 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने