जेव्हा आम्ही मुले होतो
सकाळी उठताच आमचे लक्ष
पश्चिमेकडे जात असे
जिथे एक घर होते
ज्याच्या खिडक्या सोन्याच्या होत्या
दूरुनच झळाळत असत
आम्ही दररोज हे पाहात असू
मग आमच्या घराला पाहून उदास होत असू
एकेदिवशी आम्ही त्याबाजूला गेलो
चालता चालता दुपार झाली होती
पण आम्ही चालत राहिलो आणि पोहोचलो अखेरीस
ते घर आमच्या घरासारखेच होते
सर्वसाधारण
आम्ही माघारी परतण्यास उद्युक्त झालो,उदास
आता सूर्य मागे होता
आणि खूप दूरवर एक घर दिसत होते पूर्वेकडे
ज्याच्या खिडक्या सोन्याच्या होत्या
दुरूनच झळाळत असलेल्या,
ते आमचे घर होते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
सोने का घर
जब हम बच्चे थे
सुबह उठते ही हमारी निगाहें
पश्चिम की ओर चली जाती थीं
जहां एक घर था
जिसकी खिड़कियां सोने की थीं
दूर से ही दमकतीं
हम रोजाना इसे देखते थे
फिर अपने घर को देखकर मायूस हो उठते थे
एक दिन हम उस ओर गए
चलते चलते दुपहर हो गई थी
पर हम चलते रहे और पहुंच गए
आखिरकार
वह घर हमारे घर जैसा ही था
साधारण सामान्य
हम लौटने को उद्यत हुए ,मायूस
अब सूर्य पीछे था
और बहुत दूर एक घर दिखाई दे रहा था पूरब में
जिसकी खिड़कियां सोने की थीं
दूर से ही दमकतीं
वह हमारा घर था
©विनोद पदरज
Vinod Padraj