ज्यांनी चोरलीत आमची मुले
आमच्या जमिनी,आमची जंगले
या ग्रहाचे आनंददायी वर्तमान आणि
भविष्य तसेच आपापल्या
राष्ट्राच्या संकुचित परिघात आईबद्दल
'जय मातृभूमी'चा निव्वळ
पोकळ कल्ला करताहेत
ते ना आम्हा गनिमी कावा करणार्या आयांना जाणतात
ना गोर्कीच्या आईला
त्यांच्या इतिहासात नाहीये
झलकारी बाई
नाहीये सिनगी दई आणि कइली दई
फुलो-झानो,माकी मुंडा आणि
देवमनी भगतदेखील नाहीयेत
ते तर लक्ष्मीबाईला सुद्धा पुरूषी म्हणतात,
तिला बाई नाही मानत
ते कोण आहेत जे आयांचा बाजार सजवित असतात
विसरू पाहातायत
राणी गायदिनल्यू ला
ते कोण आहेत जे गर्भाला त्रिशूळांच्या टोकांवर झेलताहेत आणि
हजारो
उन्मादी नरड्यांनी चित्कारतायत,
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः'
जे जाणत नाहीत माता-माऊल्यांना
तेच बनवितात
आईला ग्लोबल उत्पादन
ते विसरत असतात
की आईचे दूध फक्त दूध नसते
रक्त पण असते
जे तिच्या गनिमी काव्याच्या शरीरापासून सुरू होऊन
धावत राहाते लढवय्यांच्या देहाच्या अफाट विस्तारापर्यंत
जे कायम ठेवत असते
प्रत्येक आत्म्याला सजीव आणि सक्रिय.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जिन्होंने चुराये हमारे बच्चे
हमारी जमीन, हमारे जंगल
इस ग्रह का आनंदमय वर्तमान और भविष्य
और जो अपने अपने
राष्ट्र की संकुचित घेरेबंदी में
मां की बात करते हैं
जय मातृभूमि का थोथा शोर करते हैं
वे न हम छापामार मांओं को जानते हैं
न ही गोर्की की मां को
उनके इतिहास में नहीं है झलकारी बाई
नहीं हैं सिनगी दइ और कइली दइ
फूलो-झानो, माकी मुंडा और देवमनी भगत भी नहीं हैं
वे तो लक्ष्मी बाई को भी मरदाना कहते हैं
उसे स्त्री नहीं मानते
वे कौन हैं जो मांओं का बाजार सजाते हैं
भूला देना चाहते हैं रानी गाइदिनल्यू को
वे कौन हैं जो कोंख को त्रिशुलों पर उछालते हैं
और हजारों उन्मादी कंठों से चीखते हैं
यत्र नार्यस्तु पूजयंते रमंते तत्र देवता
जो नहीं जानते हैं मांओं को
वही बनाते हैं मां को ग्लोबल उत्पाद
वे भूल जाते हैं
कि मां का दूध सिर्फ दूध नहीं होता
रक्त होता है
जो उसकी छापामार देह से शुरू होकर
दौड़ता रहता है लड़ाकों की देह के अनंत विस्तार तक
जो बनाये रखता है
हर एक आत्मा को
सजीव और सक्रिय
©शाहिद अख्तर
Shahid Akhtar