पाच कविता
अदृश्य हिंसा
काळ असा आहे की
थोडेसे गवतदेखील मुठीत धरून
दाबले तरी
बोटांमधून
रक्त ठिबकायला लागतं.
---
कपट
दंव आणि अश्रूंनी भरलेल्या
कविता
पूर्वी घामाचे डाग पुसत असत
आता रक्तांचे डाग
पुसतात.
---
मौन
जेव्हा हत्या या नित्याची
बाब बनून जातात
तेव्हा चित्कारांची जागा
मौन घेत असते.
मौन जे एके दिवशी फुटते
बाॅम्बप्रमाणे.
---
हुकूमशहाचे रहस्य
हुकूमशहा दुःस्वप्नांमुळे वैतागलेले
आणि थकले-भागलेले असतात.
त्यांच्या विजारी दिवसा
रक्ताने चिंब असतात
आणि रात्री लघवीने.
---
यशाचे अपराध
जो अधिकाधिक यशस्वी होण्याचे
आणि शिखरापर्यंत पोहोचण्याचे
जीवापाड प्रयत्न करीत आहे
तो एक तर आपल्या खूप लाजिरवाण्या अपराधांना मागे
सोडून देऊ आणि विसरून जाऊ पाहातो आहे
किंवा तो कधीही एखादा भयानक गुन्हा करू शकतो.
जो काहीही करून
विजय आणि यशप्राप्ती मिळवू पाहातोय
तो सर्वात धोकादायक गुन्हेगार होण्याची वा
बनण्याची अधिकाधिक
शक्यता असते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पाँच छोटी कविताएंँ
अदृश्य हिंसा
समय ऐसा है कि
थोड़ी घास भी मुट्ठी में भरकर
दबाते हैं तो
उँगलियों के बीच से
ख़ून टपकने लगता है।
**
छल
ओस और आँसुओं से भरी
कविताएँ
पहले पसीने के धब्बे पोंछती थीं,
अब ख़ून के दाग़
पोंछती हैं।
**
चुप्पी
जब हत्याएँ रोज़मर्रा की
चीज़ बन जाती हैं
तो चीखों की जगह
चुप्पी ले लेती है।
चुप्पी जो एक दिन फटती है
बम की तरह।
**
तानाशाह का रहस्य
तानाशाह दुस्स्वप्नों से परेशान
और थके हुए होते हैं।
उनकी पतलूनें दिन में
ख़ून से तर होती हैं
और रात में पेशाब से।
**
सफलता के अपराध
जो बहुत अधिक सफल होने की
और शिखर तक पहुँचने की
जीतोड़ कोशिशें कर रहा है
वह या तो अपने बहुत शर्मनाक अपराधों को
पीछे छोड़ देना और भूल जाना चाहता है
या फिर कभी भी कोई
भयंकर अपराध कर सकता है।
जो किसी भी क़ीमत पर
सफलता और यश चाहता है
उसके सबसे ख़तरनाक अपराधी होने
या बन जाने की अधिकतम सम्भावना होती है।
©कात्यायनी
Katyayani Lko