🚩
त्र्यंबकेश्वराच्या दारी
भटी कट्टरतेची स्वारी
सलोख्याचे मारेकरी
फोफावले
गांधीजींचा मूळ प्रांत
अहिंसाप्रदेश गुजरात
तेथून झाली सुरूवात
कर्मठतेस
गांधीयुग पडले मागे
दिल्लीत कारभारी दोघे
मोदिशाचे कर्कश्श भोंगे
वाजताती
संस्कृतीरक्षणाची मखलाशी
गंगा-जमनीवर राग खुनशी
कर्नाटकात जिरली खाशी
कमळीची
महाराष्ट्र गायपट्टा व्हावा
दिल्लीचा जुनाच फतवा
'दवे-शाळीग्राम'ला जुंपावा
द्वेष-कार्या
'खतरे में'ची बोंब ठोकावी
दंगलीची कट्यार उपसावी
मतांसाठी सकळ नासवावी
मराठीभूमी
अगा गद्दारीची हद्द जाहली
खोक्यांसाठी निष्ठा विकली
ईडी-धाडीला पुरती भ्याली
मिंधेसेना
दिल्लीश्वराचा न घडो रोष
दक्ष कावेबाज पेशवाईचा अंश
दौलतीला फडणविसी दंश
होतच आहे!
🚩
भरत यादव
Bharat Yadav