आईचा भूतकाळ

आईचा भूतकाळ

आईचा भूतकाळ

आई ही आईच असते,
पण एकेदिवशी
आईच्या एका जुन्या मैत्रिणीने 
आम्हांला सहजच सांगितले की
तुमची आई जेव्हा तरुण होती तेव्हा खूपच सुंदर होती!

अरेच्चा!
असा तर आईबाबत आम्ही कधी विचारच केला नव्हता की!

माझी आई जर सुंदर होती
तर मग तिच्या 'प्रेमाचे किस्से' देखील असतील.
आम्हां मित्रांप्रमाणे तिचेही काही मित्र असतील,
ज्यात मुलीही असतील आणि मुलेदेखील.
आईचे एखादे नावसुद्धा असेल.

आता तर आपण आईच्या नावाला 'म्युझियम' मध्येच ठेवले आहे
जिथे कधी कधी आपण फिरून येत असतो आणि  
दंभ करीत असतो की आपल्याला आपल्या आईचे संपूर्ण नाव माहित आहे!
पण आता आश्चर्य वाटते याचे 
की, पूर्वी कधीतरी तिला 
तिच्या नावानेच हाक मारली 
जात असेल ना!

परंतू अखेरीस
आपले प्रेम दफन करून,
सख्या-सवंगड्यांना मागे सोडून
आपले नाव एका गाठोड्यात बांधून,
ते वाहत्या नदीत भिरकावून 
ती सासरी आली असेल ना!

कदाचित कधी कधी
ती सर्वांची नजर चुकवून
आपल्या समाधीवर परतत असेलही,
काही शुभ्र फुलेदेखील अर्पण 
करीत असेल,
कदाचित कधी ती नदीकिनारी एकटी बसत पण असेल,
याच्या प्रतिक्षेत की कदाचित प्रवाह माघारी फिरेल 
आणि तिला तिच्या नावाचे गाठोडे दिसेल.

आजकाल तर उत्खननाची 
फॅशनच आहे,
पण काय आपल्यात ते धाडस आहे? 
का की आपण आपल्या आईच्या 
भूतकाळाचे उत्खनन करू शकू?
आणि अशा प्रत्येक गोष्टींच्या जीवाश्मांचा 
शोध घेऊ शकू ज्यांनी
'मातृप्रतिष्ठे'चा गळा आवळला आहे.
काय आम्ही आपल्या माय-माऊल्यांना
आपली प्रेमकथा लिहिण्यासाठी प्रोत्साहित करू शकू?

एवढे तर निश्चित आहे
ज्यादिवशी आमच्या माता
आपल्या प्रेमकथा लिहायला सुरूवात करतील, 
त्यादिवशी पुरूषसत्ताकतेच्या खुंट्या हलतील परंतू
त्यांच्या लेकी-बाळींच्या आयुष्यात मात्र वसंतऋतु फुलेल!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

माँ तो माँ ही होती है
लेकिन एक दिन
माँ की एक पुरानी सहेली ने हमसे यूं ही कहा
तुम्हारी माँ जब जवान थी तो बहुत ही खूबसूरत थी!

ओह!
ऐसे तो माँ के बारे में मैंने कभी सोचा ही नहीं था.

मेरी माँ अगर खूबसूरत थी
तो उसके प्रेम के किस्से भी होंगे.
हम दोस्तों की तरह उसके भी कुछ दोस्त होंगे
जिनमे लड़कियां भी होंगी और लड़कें भी.
माँ का एक नाम भी होगा.

अभी तो हमने माँ के नाम को 'म्यूजियम' में रख दिया है
जहां कभी कभी हम घूम आया करते हैं
और यह सोच कर गर्व करते हैं कि 
हमे अपनी माँ का पूरा नाम पता है.
लेकिन अब आश्चर्य होता है, यह सोचकर
कि कभी उसे उसके नाम से ही पुकारा जाता होगा.

लेकिन अंततः
अपने प्रेम को दफना कर, दोस्तों को पीछे छोड़ कर
अपने नाम को एक पोटली में लपेटकर,
बहती नदी में फेंककर
वह ससुराल आयी होगी!

शायद कभी कभी
वह सबकी नजर बचाकर
अपनी कब्र पर लौटती भी हो, 
कुछ सफेद फूल भी चढ़ाती हो
शायद कभी वह नदी किनारे अकेले बैठती भी हो
इस इंतजार में कि शायद धारा पलट जाए
और उसे उसके नाम वाली पोटली दिख जाए.

आजकल तो खुदाई का फैशन है
लेकिन क्या हमारे अंदर वह साहस है
कि हम अपनी माँ के अतीत की खुदाई करें.
और हर उस चीज के फासिल्स की तलाश करें
जिसका 'माँ की गरिमा' ने गला घोंट दिया है.
क्या हम अपनी मांओं को अपनी प्रेम कहानी 
लिखने के लिए प्रेरित कर सकते हैं?

इतना तो तय है,
जिस दिन हमारी मांओं ने
अपनी प्रेम कहानियां लिखनी शुरू कर दी
उस दिन पुरुष सत्ता की चूले तो हिलेंगी ही
लेकिन
उनकी बेटियों के जीवन में बसंत आ जायेगा!

©मनीष आझाद
Manish Azad 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने