१
कितीक फुलं होती
जे तुझ्या अंबाड्यासाठी तरसत राहिले
आणि दूर कुठेतरी डोंगरदर्यात
बेवारस मारले गेले
२
कितीक फुलं होती
ज्यांना तू
केवळ स्पर्शून फुलपाखरू बनवू शकत होतीस.
३
फुलं उमलतात
प्रेमी फुलांना तोडून नेतात
फुलं आनंदाने उमलून येतात.
४
एक तू होतीस
दूसरे रातराणीची फुलं
मी मरणगाढ झोपेतही सांगू शकत होतो की
माझ्यापाशी कोण आहे?
५
एका फुलाआड
लपत असत मारेकरी
आणि म्हणत असत-
कमळ उमलेल.
६
खूप सारी फुले होती
निरनिराळे सुगंध होते
वेगवेगळाली रूपे होती
पण एका फुलाने
दूसर्या फुलाला कधी नाही म्हटले-
तू अस्पृश्य आहेस.
७
जसजशी रात्र सरत जायची
तुझ्या आठवणीची फुलं उमलत असत
आणि माझी खोली दरवळून उठत असे
शेजारी म्हणायचे-
ही रातराणी आहे
मी म्हणायचो-
नाही,ही माझी राणी आहे.
८
त्या अखेरच्या दिवसात
जेव्हा तू सोबत रडायचीस
आणि उशीवर टपकत असत अश्रू
मी विचार करायचो-
सकाळपर्यंत उशीवर फुलं उमलतील.
९
ज्या फुलांची नावं
आम्हांस ठाऊक नव्हती
त्यांना फुलं म्हटले जायचे
विचार करायचो
जर,माणसांत पण असं असतं!
१०
तू हाक मारशील
तर आताही परतेन
प्रेमाने स्पर्श करशील
तर शिळी फुलंसुद्धा दरवळतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कितने फूल थे
_________________________
एक.
कितने फूल थे
जो तुम्हारे जूड़े के लिए तरसते रहे
और दूर कहीं पहाड़ी जंगलों में
लावारिस मारे गए
दो.
कितने फूल थे
जिन्हें तुम
सिर्फ छूकर तितली बना सकती थी।
तीन.
फूल खिलते हैं
प्रेमी फूलों को तोड़ ले जाते हैं
फूल खुशी से खिलते हैं।
चार.
एक तुम थी
दूसरे रातरानी के फूल
मैं मौत जैसी नींद में भी बता सकता था कि
मेरे पास कौन है?
पाँच.
एक फूल की आड़ में
छिप जाते थे हत्यारे
और कहते थे-
कमल खिलेगा।
छह.
बहुत सारे फूल थे
अलग अलग गंध थी
अलग-अलग रूप थे
पर एक फूल ने
दूसरे फूल से कभी नहीं कहा-
तुम अछूत हो।
सात.
जैसे-जैसे रात बीतती थी
तुम्हारी याद के फूल खिलते थे
और मेरा कमरा महक उठता था
पड़ोसी कहते थे- यह रातरानी है
मैं कहता था- नहीं, यह मेरी रानी है।
आठ.
उन आखिरी दिनों में
जब तुम साथ-साथ रोती थीं
और तकिए पर गिरते थे टप-टप आँसू
मैं सोचता था-
सुबह तक तकिए पर फूल खिलेंगे।
नौ.
जिन फूलों के नाम
हम नहीं जानते थे
उन्हें फूल कहते थे
सोचता था
काश, मनुष्यों के साथ भी ऐसा होता।
दस.
तुम पुकार लो
तो अब भी लौट आऊँ
प्यार से छू लो
तो बासी फूल भी महक उठते हैं।
©विहाग वैभव
Vihag Vaibhav