जंगल हरले नाहीए कधी

जंगल हरले नाहीए कधी

जंगल हरले नाहीए कधी

हे रामा,
जेव्हा तू धर्मरक्षणार्थ 
शूद्र शंबुकाची हत्या केलीस 
तेव्हा असे होऊ शकत नाही की 
शंबुकाच्या वंशजांनी तुझ्याविरूद्ध 
बाण चालवले नसतील.

हे रामा!
जेव्हा तू रानावनात वणवण भटकत होतास 
आपल्या पत्नी आणि भावासोबत 
तेव्हा एका अरण्यकन्येने
तुझ्या भावापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला
आणि तुझ्या भावाने 'धर्म' रक्षणार्थ
प्रेमावर तलवार चालवली आणि
अरण्यकन्या शूर्पनखा झाली!

हे रामा!
जेव्हा प्रेमावर तलवार चालली
तेव्हा जंगल संतापाने पेटले आणि
युद्धास तोंड फुटले ज्याला रामायण
म्हटले गेले.
असे नाही की त्या युद्धात तुझ्याविरूद्ध बाण चालले नसतील
मारले गेले होते खूप सारे लोक तुमचेदेखील,
प्रेमद्रोही लक्ष्मण रणांगणावर बेशुद्ध होऊन पडला होता
तेव्हा तू युगत केलीस,बिभीषणाला
फितुर बनवलेस,ज्याने सगळी गुपीते
सांगितली आणि 
युद्धात तू विजयी घोषीत झालास.

हे रामा!
आज जेव्हा तुझेच मनसुबे मनात धरलेले लोक आलेत 
जंगलातल्या हिरवाईची शिकार करण्यासाठी,
जंगलाकडून विषयुक्त बाणांचा वर्षाव झाला होता,
तिलक मांझीच्या बाणांनी
छेदले,वेधले गेले होते गोरे इंग्रज
तसे,
या युद्धात गोरे एक पाऊल मागे हटले होते 
आणि माघारी परतले होते आपल्या देशात,
तसेच जसे तू परतला होतास 
फितुर बिभिषणाहाती सत्ता सोपवून.

हे रामा!
ठाऊक आहे मग काय घडले?
ऊलगुलानचा नायक
तिलक मांझी शहिद झाला आणि
लढाईची सूत्रे पुढे जंगल संथाल,
चारू मजुमदार यांनी सांभाळली होती
नक्षलवाडीत तर
असे घमासान घडले की विचारू नकोस
जंगल-डोंगरातली ठिणगी
गावागावात पसरली होती
मुठी उंचावत असलेले लोक
अमार बाडी तुमार बाडी!
नक्षलबाडी नक्षलबाडी!!
आमची वाडी तुमची वाडी!
नक्षलवाडी नक्षलवाडी!!
चा नारा लगावत होते

हे रामा!
हे युद्ध तेव्हापासून आजपर्यंत
सुरूच आहे,
जल-जंगल आणि जमिनी
ताब्यात ठेवण्याची आकांक्षा
ना तुझ्या बाजूच्या लोकांनी सोडली
ना जंगलाकडून
त्याला वाचविण्याची लढाई जंगलातील लोकांनी सोडली.

हे रामा!
हे बघ,सैन्यदळ
चालून येत आहे,पुढे सरकत आहे
जंगलात जागोजागी
छावण्या उभारल्या जाताहेत
अरण्यकन्या
त्यांच्या हिंसक खूनी दातांनी
ओरबाडल्या गेल्याने रक्तबंबाळ आहेत
त्यांच्या बंदूकांच्या गोळ्यांनी,
आता आता
बस्तरच्या जंगलावर
चढाई करताहेत,पुढे पुढे सरकताहेत

सैनिकांना खबरदार! च तर म्हटले होते,
बदल्यात बस्तरच्या लेकी-पुत्रांच्या छातींची चाळणी केली होती शिपायांनी.
खबरदार!!
प्रेमद्रोही परंपरेच्या लोकांनो,
हिरवाई-वनराईच्या शिकार्‍यांनो
खबरदार!
जंगलात ऊलगुलानचा नारा
पुन्हा घुमला आहे आणि 
जंगलातले लोक विषयुक्त बाणांसोबत आता
बंदूकीच्या गोळ्या चालवत आहेत
भूसुरंग पेरताहेत
म्हणून या युद्धात पराभव कुणाचा होईल?
हे निश्चित नाही अद्याप
तसे तर
जंगल हरले नाहीए कधी.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

जंगल हारा नहीं है कभी

हे राम !
जब तुमने
धर्म की रक्षा में
शूद्र शम्बूक की हत्या की
तब
ऐसा नहीं हो सकता कि
शम्बूक के वंशजों ने
तुम्हारे विरुद्ध तीर न चलाएं हों।
हे राम !
जब तुम
जंगल - जंगल भटक रहे थे
अपनी पत्नी और भाई के साथ
तब
जंगल की एक बेटी ने
तुम्हारे भाई के सामने
प्यार का इजहार किया
और तुम्हारे भाई ने
'धर्म' की रक्षा में
प्यार पर तलवार चलाया
और जंगल की बेटी
सूर्पनखा हो गयी।
हे राम!
जब
प्यार पर तलवार  चली
तब
पूरा जंगल ही गरमाया
छिड़ गया युद्ध
जो रामायण कहलाया ।
ऐसा नहीं कि , उस युद्ध में
तुम्हारे विरुद्ध तीर न चलें हों
मारे गए थे
ढेर सारे लोग तुम्हारे भी
यहाँ तक कि
प्रेमद्रोही लक्ष्मण
युद्ध भूमि में मूर्छित पड़ा था
तब तुमने
युगत लगाया
विभीषण को मुखबिर बनाया
जिसने सारा राज बताया
और युद्ध में तुम
विजयी घोषित हुए ।
हे राम!
आज
जब
तुम्हारे ही मनसूबे पाले लोग आये
जंगल की हरियाली का शिकार करने
जंगल की ओर से
जहर बुझे तीरों की बौछार हुई थी
तिलका मांझी के तीर से
छेदे , बेधे गए थे गोरे अंग्रेज
वैसे, इस युद्ध में
गोरे एक कदम पीछे हटे थे
और लौट गए अपने देश
वैसे ही जैसे
तुम लौटे थे
मुखबिर विभीषण को सत्ता सौंपकर
हे राम!
जानते हो फिर क्या हुआ?
उलगुलान का नायक
तिलका मांझी शहीद हो गया
और लड़ाई की कमान
जंगल संथाल ,चारु मजूमदार ने सम्हाल ली थी
नक्सलबाड़ी में तो
वह घमासान हुआ कि
बस पूछो मत
जंगल पहाड़ की चिंगारी
गाँव - जवार में फैल गई थी
मुट्ठियाँ लहराते लोग
अमार बाड़ी तुमार बाड़ी!
नक्सलबाड़ी  नक्सलबाड़ी !!
का नारा लगा रहे थे
हे राम!
यह युद्ध
तबसे अब तक
चलता ही आ रहा है
जल - जंगल - जमीन पर
कब्जेदारी की उम्मीद
न तुम्हारे पक्ष के लोगों ने छोड़ी
न ही जंगल की ओर से
उसे बचाने की लड़ाई जंगल के लोगों ने छोड़ी ।
हे राम!
यह देखो
सेना के लोग
चले आ रहे हैं, बढे आ रहे हैं
जंगलों में जगह - जगह
कैम्प लगा रहे हैं
जंगल की बेटियाँ
उनके  हिंसक खूनी दांतों से काटे जाने से
खून से लतफत हैं
जंगल के बेटे लहूलुहान हैं
उनकी बंदूकों की गोलियों से
अभी - अभी
बस्तर के जंगलों में
बढ़े आ रहे , चढ़े आ रहे
सिपाहियों को
खबरदार ! ही तो कहा था
बदले में बस्तर के बेटी, बेटों का सीना
छलनी कर दिया था सिपाहियों ने
खबरदार!!
प्रेमद्रोही , रवायत के लोगों
हरियाली के शिकारियों
खबरदार!!
जंगल मे उलगुलान का नारा
फिर से गूंज उठा है
और जंगल के लोगों ने
ज़हर बुझे तीर के साथ - साथ
बंदूक की गोलियाँ चलाने लगे हैं
बारूदी सुरंग बिछाने लगे हैं
इसलिए
इस युद्ध में
हार किसकी होगी?
यह तय नहीं है अभी
वैसे
जंगल हारा नहीं है कभी।

( नक्षलबाडी दिवस पर..)

©विश्व विजय
Vishwa Vijai 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने