तुझे काव्य
तुझे साहित्य
आणि तुझे सौंदर्यशास्त्र
सगळे व्यर्थ आहे माझ्यासाठी
हे ना माझ्या जखमांसाठी
मलम बनतात
ना माझ्या तहानेसाठी पाणी बनतात
ना माझ्या भुकेसाठी भाकर बनतात
ही तुझी आपली अवजारे आहेत
जी तू स्वतःच्या सहाय्यासाठी
निर्मिली आहेत
शतकांपासून तुझे मूकदर्शक मन
शोषण आणि दमन यांच्या
खेळाला पाहून
कधी कुठल्याशा निराशेने
भरून जात असेल
कधी एखाद्या बेसावध क्षणी
कुठलासा अपराधबोध तुला
डाचत असेल
म्हणून रचत असतोस तू
ती काव्ये
त्या कथा
ती तसबीर
ज्यात शोषित आणि
दलितांच्या दुःखाचे एक भयंकर चित्र दिसून येते
हे चित्र चितारून
काही न करतादेखील
काहीतरी केल्याचे,करण्याचे
तू नाटक करीत असतोस
अशाप्रकारे निराशा आणि
अपराधबोधाच्या वेदनेपासून
तुझी सुटका होते
पण मला ना समाधान मिळते
ना कुठला उपाय गवसतो
अत्याचारी आणि अत्याचारग्रस्त यांना
दुःखाच्या चित्रणाची काय गरज?
दोघे चांगल्याप्रकारे ते जाणत असतात,
आपापल्या पद्धतीने
ते जाणत नाहीत तो
फक्त एखादा उपाय
जो तुला ठाऊक आहे
पण सांगत नाहीस
उपाय लपवून
वेदनेच्या चित्रणाची आवश्यकता
माझी गरज नाही
ही तुझी गरज आहे
तू जे स्वतःच्या आणि स्वजनांच्या
त्या पवित्र द्विज अस्तित्वाला
माझ्या एकमेव जन्माच्या शक्यतेला
चुरगळत युगायुगांपासून वाचवत आलायस
तू जाणतोस की
उपाय प्रत्यक्षात येण्याने
तू
तुझी रचना आणि
तुझे द्विजत्व या
तिन्हींचा अंत होऊन जाईल
त्यासाठी तू टाळतोयस उपाय
आणि रचतोयस
वेदेनेचे चित्र वारंवार
ज्यात माझ्या समाजाचे
ठिबकणारे रक्त
तुझ्या कुंचल्यांनी आणि
लेखण्यांनी
रंग बनून फुलारत असते
परंतू आज
हा कुंचला आणि लेखणी
मी आपल्या हातात घेत आहे
म्हणजे माझा समाज
आपले काव्य
आपले साहित्य
आणि आपले सौंदर्यशास्त्र
स्वतः रचू शकेल
आपल्या ठिबकणार्या रक्ताने
आपल्या भविष्याची उपाययोजना
आपल्याच हातांनी स्वतः लिहू शकेल.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
तुम्हारा काव्य
तुम्हारा साहित्य
और तुम्हारा सौन्दर्यशास्त्र
सब व्यर्थ हैं मेरे लिए
ये न मेरे जख्मों के मरहम बनते हैं
न मेरी प्यास के लिए पानी बनते हैं
न मेरी भूख के लिए रोटी बनते हैं
ये तुम्हारे अपने उपकरण हैं
जो तुमने अपनी मदद को रचे हैं
सदियों से तुम्हारा मूक दर्शक मन
शोषण और दमन के खेल को देख
कभी किसी ग्लानि से भर जाता होगा
कभी किसी कमजोर क्षण में
कोई अपराध बोध तुम्हें काटता होगा
इसीलिये रचते हो तुम
वो काव्य वो कथा वो तस्वीर
जिसमे दमित और दलित की पीड़ा का
एक भयावह चित्र उभरता है
इस चित्र को उभारकर
कुछ न करते हुए भी
कुछ करने का तुम नाटक करते हो
इस तरह ग्लानि और अपराध की टीस से
तुम्हे राहत मिलती है
लेकिन मुझे न राहत मिलती है
न कोई समाधान
पीड़क और पीड़ित को
पीड़ा के चित्रण की क्या जरूरत?
वे दोनों भलीभांति इसे जानते हैं
अपने अपने ढंग से
वे नहीं जानते तो
बस एक समाधान
जो तुम जानते हो
लेकिन बताते नहीं
समाधान छुपाकर
पीड़ा के चित्रण की जरूरत
मेरी जरूरत नहीं है
ये तुम्हारी जरूरत है
तुम जो कि अपने और अपनों के
उस पवित्र द्विज अस्तित्व को
मेरे एकमात्र जन्म की संभावना को मसलकर
युगों युगों से बचाते आये हो
तुम जानते हो
कि समाधान के साकार होने में
तुम, तुम्हारी रचना और तुम्हारे द्विजत्व
तीनों का अंत हो जाएगा
इसलिये तुम टालते हो समाधान
और रचते हो पीड़ा के चित्र बार बार
जिसमे मेरी कौम का रिसता लहू
तुम्हारी कूचियों और कलमों में
रंग बनकर खिलता है
लेकिन आज
ये कूची और ये कलम
मैं अपने हाथ में लेता हूँ
ताकि मेरी कौम
अपना काव्य अपना साहित्य
और अपना सौन्दर्यशास्त्र
खुद रच सके
अपने रिसते लहू से
अपने भविष्य का समाधान
अपने ही हाथों खुद लिख सके
©डॉ संजय जोठे
DrSanjay Jothe