नवा मध्ययुगीन काळ

नवा मध्ययुगीन काळ

नवा मध्ययुगीन काळ

भूतकाळात फक्त एक कुजबुज होती
वर्तमानाने रहस्य उलगडले आहे-
सर्वकाही नवे करण्याच्या हव्यासात लपली होती जुन्याविषयीची ऐतिहासिक घृणा

नवा, बलात्कारी आणि खून्यांना पुष्पहार घालत होता
तर जुना हात पकडत होता,
दोन हजार चौदा, 
स्वातंत्र्याच्या शुभेच्छा द्यायचा
तर एकोणिसशे सत्तेचाळीस 
हसायचा

त्यासाठी नवे करून अमर होण्याचा हव्यास 
आणि जुन्याविषयीची घृणा
एकमेंकांच्या स्पर्धेत होते

त्यांना नवा भूतकाळ हवा होता,
नवा इतिहास समाजशास्त्राच्या 
नव्या भूगोलात भरकटत गेली होती जनता, 
म्हणून त्यांना 
नवी जनता हवी होती

संसदेपासून संविधानापर्यंत
जे ते नवे करू शकत होते, 
करीत होते
पण अजूनही काही गोष्टी होत्या
ज्यांना नव्याने बनविण्यात अडचणी येत होत्या

उदाहरणार्थ,
आंबेडकर,गांधी आणि नेहरू यांना
नव्याने बनविण्यात 
एकच अडचण होती
की ते दिवंगतांना जिवंत करणे जाणत नव्हते,
पण प्रयत्नात कुठली कसर सोडलेली नव्हती

हे प्रयत्नानेच शक्य झाले की
ते तीन पावलांत मोजीत असतात शतके आणि 
एकविसाव्या शतकाला
नविन मध्ययुगीन काळात बदलवून टाकतात

आता त्यांच्याजवळ 
नवा भूतकाळ आहे
नवा भक्तीकाळ,नवी संसद आहे
नवे न्यायशास्त्र आहे

भूतकाळातील कुजबुजीचे 
रहस्य स्पष्ट झालेय-
इतिहासाला बदलल्याने बदलत असते समाजशास्त्र.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

नया मध्यकाल

अतीत में बस एक फुसफुसाहट थी
वर्तमान ने रहस्य उजागर किया - 
सबकुछ नया कर देने की हवश में छिपी थी
पुराने के प्रति ऐतिहासिक घृणा 

नया, बलात्कारियों और हत्यारों को माला पहनाता था 
तो पुराना हाथ पकड़ता था 
दो हजार चौदह कहता था - आज़ादी मुबारक
तो उन्नीस सौ सैंतालीस हँस पड़ता था 

इसलिए नया करके अमर हो जाने की हवश 
और पुराने के प्रति घृणा 
परस्पर प्रतियोगिता में थे

उन्हें नया अतीत चाहिए था, नया इतिहास 
समाजशास्त्र के नए भूगोल में भटक गयी थी जनता 
सो उन्हें नयी जनता चाहिए थी 

संसद से संविधान तक 
जिन्हें वे नया कर सकते थे, कर रहे थे 
पर अब भी कुछ चीजें थीं
जिन्हें नया करने में मुश्किल आ रही थी

मसलन, अम्बेडकर, गाँधी और नेहरू को नया करने में एक ही मुश्किल थी 
कि वे मृतकों को जिंदा करना नहीं जानते थे
पर कोशिश में कोई कमी नहीं थी 

यह कोशिश से ही सम्भव हुआ कि 
वे तीन कदम में नाप देते हैं सदियाँ 
और इक्कीसवीं सदी को 
नए मध्यकाल में बदल देते हैं 

अब उनके पास नया अतीत है, नया भक्तिकाल 
नयी संसद , नयी जनता, है नया न्यायशास्त्र

अतीत की फुसफुसाहट का रहस्य उजागर हुआ- 
इतिहास को बदलने से बदलता है समाजशास्त्र। 

©विहाग वैभव
Vihag Vaibhav 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने