( विहाग वैभव साठी )
नव्या शतकात मारेकरी
नव्या शस्त्रांनिशी सज्ज होते
त्यांनी देवालयांमधून देव चोरले
आणि त्यांना धारदार शस्त्रांमध्ये बदलवून टाकले
त्यांनी सकाळ सकाळी बागेतून फुले निवडली आणि
त्यांना शस्त्रांमध्ये बदलवले
त्यांनी शहरांचे नकाशे उचलले
आणि पवित्र रंगांना लवंडून दिले
आणि काय आश्चर्य!
चक्क नकाशे विरघळुन
रक्तात फुलून आले
अशा प्रकारे रंगांनादेखील त्यांनी हत्यारांमध्ये बदलवले
त्यांनी नृशंस खून पाडले
आणि त्याला कलेची संज्ञा दिली
आणि संस्कृतीच्या वारशामध्ये गणले
ते कलावंतांप्रमाणे आले
ते उद्धारकर्त्यांप्रमाणे आले
ते महामानवांप्रमाणे आले
त्यांनी भविष्याला एका फुलाच्या रूपकात गुंफले
त्यांनी देशालाही
एका नाजूक फुलाच्या उपमेने गौरवले आणि माणसांना पोकळ करून त्यांच्यात बारूद ठासले
त्यांनी त्यांच्या फुलांसारख्या हाता-पायांकरवी शस्त्रांची कामे
करवून घेतली
अशाप्रकारे नव्या शतकात मारेकर्यांनी
सौंदर्यालासुद्धा हत्यारांसारखे वापरले
म्हणून जेव्हा-जेव्हा वसंतऋतूची
चाहूल लागली
मी घाबरलो
त्यांनी जेव्हा जेव्हा
एखाद्या फुलास स्पर्श केला
माझा आत्मा थरकापून उठला.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
नई सदी में हत्यारे
(विहाग वैभव के लिए)
नई सदी में हत्यारे
नए हथियारों से लैस थे
उन्होंने देवालयों से ईश्वर चुराए
और उन्हें धारदार हथियारों में बदल दिया
उन्होंने सुबह-सुबह बाग़ से फूल चुने
और उन्हें हथियारों में बदल दिया
उन्होंने शहरों के नक़्शे उठाए
और पवित्र रंगों को ढुलकाया
और आश्चर्य !
कि नक़्शा गलकर
ख़ून में फूल गया
इस तरह रंगों को भी उन्होंने हथियार में बदला
उन्होंने नृशंस हत्याएँ कीं
और उसे कला की संज्ञा दी
और सभ्यता की उपलब्धियों में गिना
वे कलावंतों की तरह आये
वे उद्धारकों की तरह आये
वे महामानवों की तरह आये
उन्होंने भविष्य को एक फूल के रूपक में बाँधा
उन्होंने देश को भी
एक नाज़ुक फूल की उपमा से नवाज़ा
और आदमियों को खोखला कर
बारूद भर दिया
उन्होंने उनके फूल जैसे हाथ-पाँव से
हथियारों का काम लिया
इस तरह नई सदी में हत्यारों ने
सौंदर्य को भी हथियार की तरह बरता
इसलिए जब-जब बसंत ने दस्तक दी
मैं घबराया
उन्होंने जब-जब किसी फूल को छुवा
मेरी रूह काँप गयी।
©अदनान कफिल दरवेश
Adnan Kafeel Darwesh