कावळ्यांविषयी

कावळ्यांविषयी

कावळ्यांविषयी

ते सभ्य नाही होऊ शकले
खात असतात किडे-किटक
मृत प्राण्यांचे सडलेले मांस.
शिळा,उरला-सुरला भात.

त्यांचा आवाज कर्कश्श आहे
श्रवण करीत नाहीत अभिजात संगीत
जाणत नाहीत कला-साहित्य,
त्यांना क्रिकेटमध्येही कसला रस वाटत नाही.

ते माणसांपासून दूर राहातात
अनेकवेळा तर हल्लासुद्धा करतात
त्यांना कुणी पसंत नाही करत
कुणी त्यांना पाळत नाही
बदक आणि कोंबड्यांप्रमाणे
ते पक्षीसमाजाचे चांडाळ आहेत.

ते घरात आणि बाल्कनीत नव्हे
एखाद्या उंच झाडावर अंडी घालतात
त्यांना भीती वाटत नाही कोकिळेची
की ती मारून टाकेल त्यांची पिले.

एखादा कावळा मेला असता,
ते नटून थटून सेल्फी काढत नाहीत,
नाहीत म्हणत की किती 
आल्हाददायक वातावरण आहे डोंगरावर,
महामारीच्या काळात किंवा 
बाहेरच्या हल्ल्यानंतर
ते आपला थवा सोडून परदेशात पळून जात नाहीत,
उलट एकत्र होऊन हल्ला करतात,ओरडतात,
कोलाहल माजवतात.

त्यांच्या घरांना नाहीयेत दरवाजे
ज्यांना बंद करून ते मुलांना समजावू शकतील की आपल्याला काय देणे-घेणे या सगळ्याशी,
आपल्याला तर करायचे आहे
फक्त काम,
जमवायची आहे खूप सारी संपत्ती,
मिळवायच्या आहेत सोयी-सुविधा.

त्यांचे फोटो कुठल्या
वर्तमानपत्रात छापले जात नाहीत
ते कुणाचे हिरो नाहीत
कुणीही प्रेरणा घेत नाही
त्यांच्या जीवन आणि 
काव-काव कडून.

ते कुठला पुरस्कार स्विकारत नाहीत
कुण्या गिधाड वा घारीकडून
ज्याने एखाद्या कावळ्यास मारले असेल.

माणूस
त्यांना घाणेरडे,
असभ्य आणि अशुभ समजतो-मानतो,
जो ओरबाडून खात असतो
तरसासारखा दूसर्‍या माणसाला.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कौवो के बारे में

वे सभ्य नहीं हो पाए
खाते हैं कीड़े- मकोड़े
मरे पशुओं का सड़ा  हुआ माँस l
बासी बचा हुआ भात l

उनकी आवाज़ कर्कश है
नहीं सुनते सुरुचि पूर्ण संगीत
नहीं जानते कला-साहित्य
उनकी क्रिकेट में भी कोई रुचि नहीं l

वे मनुष्यों से दूर रहते हैं
कई बार तो हमला तक कर देते हैं
उन्हें कोई पसंद नहीं करता l
कोई उन्हें पालता नहीं
बतख और मुर्गियों  की तरह l
वे पक्षी समाज के डोम हैं l

वो घरों और बालकनी में नहीं
किसी ऊँचे पेड़ पर अंडा देते हैं
उन्हें डर नहीं लगता कोयल से
कि वो मार डालेगी उसके बच्चे 

किसी कौवे के मरने पर 
वे सजधज कर सेलफी नहीं लेते
नहीं कहते कि कितना सुहाना मौसम है पहाड़ परl
महामारी फैलने या बाहरी हमले पर 
वे अपना झुण्ड छोड़ कर विदेश नहीं भाग जाते
बल्कि इकट्ठे होकर हमला करते हैं, 
चीखते,शोर मचाते हैंl

उनके घरों में नहीं हैं दरवाज़े
जिन्हें बंद करके वो बच्चों को समझाएँ
कि हमें क्या लेना इस सब से
हमें तो करना है केवल काम
बटोरना है ढेर सारा धन, सुविधाएं l

उनकी तस्वीरें किसी 
अखबार में नहीं छपती
वे किसी के नायक नहीं हैं
कोई भी प्रेरित नहीं होता 
उनके जीवन और कांव-कांव से।

वो कोई पुरस्कार नहीं लेते
किसी गिद्ध या चील से
जिसने किसी कव्वे को मार डाला हो l

मनुष्य 
उन्हें समझता है
गंदा, असभ्य और मनहूस। 
जो नोच खाता है
लकडबग्घे की तरह 
दूसरे मनुष्य को ।

©ईश्वर शून्य
Ishwar Shoonya
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने